TRENDING:

तुमच्याही डोळ्यांना होतोय त्रास? चष्मा लागूच नये म्हणून वेळीच घ्या ही काळजी, डॉक्टरांचा सल्ला

Last Updated:
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना डोळ्या सबंधित त्रास जाणवतात.
advertisement
1/5
तुमच्याही डोळ्यांना होतोय त्रास? चष्मा लागूच नये म्हणून वेळीच घ्या ही काळजी, डॉक्टरांचा सल्ला
बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर चांगले वाईट परिणाम होत आहेत. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना डोळ्या सबंधित त्रास जाणवतात.
advertisement
2/5
काही मुलांना लहानपणीच चष्मा लागून त्याचा नंबरही वाढत आहे. तो कमी करण्यासाठी किंवा चष्मा लागूच नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. याबाबत पुणे येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. संतोष कांबळे यांनी माहिती दिलीय.
advertisement
3/5
आपल्याला चष्मा लागूच नये आणि लागला तर नंबर कमी असावा, असं सर्वांना वाटतं. यासाठी आपला आहार महत्वाचा आहे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश असावा.
advertisement
4/5
संत्री, आवळा, गाजर यांचा आहारात समावेश असेल तर डोळे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शक्य तेवढं डिजिटल उपकरणांचा वापर कमी करावा. यात 20-20 चा वापर करावा. म्हणजेच 20 फुटापर्यंत लांब असलेली गोष्ट 20 सेकंद पाहावी. यामुळे चष्म्याचा नंबर वाढत नाही, असे डॉ. कांबळे सांगतात.
advertisement
5/5
निरोगी आयुष्यासाठी योगासने गरजेची आहेत. यात डोळ्यांचे व्यायामही करावेत. डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच वेळोवेळी डोळे तपासणी देखील गरजेची आहे. आवळा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 'व्हिटॅमीन सी'मुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करावे. पुरेशी झोप, योग्य आहार आणि व्यायाम केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारून चष्म्याचा नंबरही कमी होईल, असे डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुमच्याही डोळ्यांना होतोय त्रास? चष्मा लागूच नये म्हणून वेळीच घ्या ही काळजी, डॉक्टरांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल