Sugarcane Juice : उसाचा रस आरोग्यासाठी फायद्याचा, पण दररोज किती प्रमाणात घ्यावा? कोणी घेऊ नये?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
तुम्ही उसाचा रस घेताना तो बिना बर्फ टाकता घ्यावा. कारण की रसवंतीवरती जो बर्फ वापरतो तो कशा गुणवतेचा असतो किंवा त्याची गुणवत्ता कशी असते आपल्याला माहिती नसते.
advertisement
1/7

सध्याला सर्वत्र कडाक्याचे ऊन पडत आहे. अशातच आपण जर कुठे बाहेर गेलो तर शरीर थंड होण्यासाठी आपण हमखास रसवंतीवरती रस हा घेत असतो.
advertisement
2/7
पण हा रस आपण किती प्रमाणात घ्यावा किंवा त्याचे प्रमाण किती असावे? त्यासोबतच उसाचा रस कोणी घ्यावा किंवा कोणी घेऊ नये? या सगळ्याविषयीच आपल्याला आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
3/7
सर्वप्रथम तर तुम्ही उसाचा रस घेताना हा चांगल्या रसवंतीवरून घ्यावा म्हणजेच की त्या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता असणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी उसाचा रस चांगला असणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
तसेच महत्त्वाचे म्हणजे की तुम्ही उसाचा रस घेताना तो बिना बर्फ टाकता घ्यावा. कारण की रसवंतीवरती जो बर्फ वापरतो तो कशा गुणवतेचा असतो किंवा त्याची गुणवत्ता कशी असते आपल्याला माहिती नसते. त्यामुळे तुम्ही तो घेताना बिना बर्फ टाकताच घ्यावा.
advertisement
5/7
तसेच उसामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे अशांनी उसाचा रस घेताना प्रमाणातच घ्यावा म्हणजेच की त्यांनी 100 एमएल एवढाच उसाचा रस घ्यावा. तसेच ज्यांना कोणाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही अशांनी 200 एमएल एवढाच उसाचा रस दररोज घ्यावा.
advertisement
6/7
तसेच उसाचा रस घेताना त्यामध्ये तुम्ही लिंबाचा वापर करावा किंवा त्यामध्ये थोडा अद्रक देखील टाकून घ्यावा जेणेकरून तुम्हाला कुठलाही याचा परिणाम हा होणार नाही.
advertisement
7/7
उन्हाळ्यामध्ये तुम्ही उसाचा रस हा घेतलाच पाहिजे पण घेताना त्याचे प्रमाण हे व्यवस्थित असले पाहिजे. त्याचा अतिरेक हा तुम्ही करू नये, असे आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sugarcane Juice : उसाचा रस आरोग्यासाठी फायद्याचा, पण दररोज किती प्रमाणात घ्यावा? कोणी घेऊ नये?