TRENDING:

जिलेबीसोबत रबडी नाही, दही मिळतं! वर्षानुवर्षे आहे खवय्यांची पहिली पसंत

Last Updated:
जिलेबी आणि रबडी हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडत, पण तुम्ही कधी जिलेबी दह्यासोबत खाल्लीये का? कशी लागत असेल? असा विचार आला ना मनात? अहो, लोक हे कॉम्बिनेशन आवडीने खातात.
advertisement
1/5
जिलेबीसोबत रबडी नाही, दही मिळतं! वर्षानुवर्षे आहे खवय्यांची पहिली पसंत
उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या कटरा भागात असलेल्या नेतराम मूलचंद यांच्या दुकानावर जिलेबी दह्यासोबत मिळते. जी एकदा खाल्ल्यावर ग्राहक इथं पुन्हा येतात. शिवाय इथली कचोरीसुद्धा विशेष प्रसिद्ध आहे.
advertisement
2/5
1855 पासून हे दुकान याठिकाणी सुरू आहे. दुकानदार मयंक अग्रवाल यांच्या पणजोबांनी ते सुरू केलं होतं. इथं मिळणाऱ्या दही-जिलेबीला आणि कचोरीला तोड नाही असं गाहक म्हणतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
3/5
विशेष म्हणजे या दुकानात मिळणाऱ्या पदार्थांची केवळ चव भारी नसते, तर दुकानात साफसफाईदेखील असते. शिवाय पदार्थांचं पॅकिंगसुद्धा उत्तम असतं.
advertisement
4/5
दुकानाचे मालक मयंक अग्रवाल सांगतात की, सध्या आमची पाचवी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. आम्ही आमच्या पदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देतो. हे पदार्थ खाऊन ग्राहक समाधानी व्हायला हवे, एवढंच आमचं ध्येय आहे. आम्ही विविध मिठाईची विक्री करतो परंतु कुरकुरीत जिलेबीला विशेष मागणी मिळते.
advertisement
5/5
दुकानात जिलेबी बनवणारे कामगार सांगतात की, आम्ही जिलेबीसाठी शुद्ध तूप वापरतो. जिलेबीचा बेसनही चांगल्या प्रतीचं असतं. दुकान उघडल्यापासून बंद होईपर्यंत आम्ही जिलेबी बनवत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
जिलेबीसोबत रबडी नाही, दही मिळतं! वर्षानुवर्षे आहे खवय्यांची पहिली पसंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल