Urine : दिवसभरात किती वेळा लघवी व्हायला हवी? लातूरच्या डॉक्टरांनी सांगितलं प्रमाण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Urine Time : किती वेळा लघवी व्हायला हवी, जास्त वेळा झाली तर त्याचा अर्थ काय, कमी वेळा झाली तर त्याचा अर्थ काय? याबाबत लातूरच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/7

लघवी ही नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा येते तेव्हा आपण जातो. लघवी कधीही होऊ शकते. पण दिवसभरात किती वेळा लघवी व्हायराल हवी याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? लातूरच्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
2/7
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 10 पेक्षा जास्त वेळा लघवी होत असेल तर त्या व्यक्तीला डायबेटिजसारखा शुगरचा आजार, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे लघवीचं इन्फेक्शन असू शकतं, लघवीच्या पिशवीचं इन्फेक्शन असू शकतं.
advertisement
3/7
पुरुषामध्ये 40-50 वयाच्या पुढे प्रोस्टेट ग्रंथी वाढू लागते, ती लघवीच्या पिशवीत वाढली तर तिथं लघवी शिल्लक राहते आणि नवीन लघवी तयार झाली की त्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी लघवी जास्त होते. कॉफी, दारू, कोणतंही द्रव शरीरात जास्त गेलं तर लघवी जास्त होते.
advertisement
4/7
दिवसभरात लघवी 3 किंवा त्यापेक्षा कमी वेळा होत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात पाणी कमी जात आहे. याला डिहायड्रेशन म्हणतात.उलट्या, शौचाला झालं तर शरीरात पाण्याची कमी होते. पाण्याची भरपाई केली तरच लघवी होईल.
advertisement
5/7
गंभीर म्हणजे हे किडनी फेल झाल्याचं लक्षण असू शकतं आणि जर दोन्ही किडनी चांगल्या आहेत, लघवीही तयार होते आहे, पण ती होत नाही तर ती कुठेतरी ब्लॉक झालेली आहे. तसंच हे औषधाचे दुष्परिणामही असू शकतात.
advertisement
6/7
नियमानुसार दिवसभरात 6 ते 8 वेळ लघवी हे योग्य प्रमाण आहे. कमीत कमी 4 जास्तीत जास्त 10 वेळेला लघवी व्हायला हवी. वातावरणानुसार हे प्रमाण बदलेल, असं डॉ. राम जावळे यांनी सांगितलं.
advertisement
7/7
त्यामुळे या प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी लघवी होत असेल तर काही समस्या असू शकते, त्यामुळे डॉक्टरांशी संबंध जरूर साधा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Urine : दिवसभरात किती वेळा लघवी व्हायला हवी? लातूरच्या डॉक्टरांनी सांगितलं प्रमाण