TRENDING:

महिलांनी योग्य पद्धतीनं मेकअप कसा करावा? ‘या’ टिप्स करा फॉलो होईल फायदा

Last Updated:
योग्य पद्धतीने मेकअप कसा करायचा जाणून घ्या.
advertisement
1/6
महिलांनी योग्य पद्धतीनं मेकअप कसा करावा? ‘या’ टिप्स करा फॉलो होईल फायदा
महिलांना मेकअप करायला फार आवडतो पण कोणत्याही महिलेसाठी केवळ मेकअप करणे पुरेसे नाही, तर तिला या योग्य पद्धतीने मेकअप कसा करायचा हे देखील माहिती पाहिजे. त्यामुळे याबद्दलच पुण्यातल्या मेकअप आर्टिस्ट प्रेरणा देशमुख यांनी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.
advertisement
2/6
मेकअपचा विचार केला जातो, तेव्हा प्रत्येकीच्या मनात फक्त हेवी आणि लाऊड लूक येतो. परंतु बऱ्याच काळापासून विना-मेकअप लूक ट्रेंड करत असले तरी, त्यामध्ये अनेकांना प्रभुत्व मिळालेलं नाही. बहुतेक मेकअप ट्यूटोरियलमध्ये खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सांगितलेली असते.
advertisement
3/6
तुम्ही दिवसाच्या मीटिंगसाठी तयार होत असाल, तेव्हा तुमचा बेस पूर्णपणे नैसर्गिक आणि हलका असेल याची विशेष काळजी घ्या. तो तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळणारा असावा. गडद किंवा फिकट फाउंडेशन शेड कधीही लावू नका. फाऊंडेशन तुम्हाला हेवी लूक देतोय असं वाटत असेल तर तुम्ही त्याऐवजी बीबी आणि सीसी क्रीम देखील लावू शकता, अशी माहिती देशमुख यांनी दिलीय.
advertisement
4/6
ज्या महिलांना परफेक्ट फाउंडेशन कसे लावायचे हे माहित नाही, त्या दिवसाही कॉम्पॅक्ट लावू शकतात. हे तुम्हाला मॅट फिनिश देईल.दिवसा शक्यतो गडद लिपस्टिक टाळा. त्याऐवजी, तुम्ही ग्लॉस, हलकी लिपस्टिक, न्यूड लिपस्टिक किंवा टिंटेड लिपस्टिकला प्राधान्य द्यावे.
advertisement
5/6
तुम्ही, दिवसा फॉर्मल आउटफिटमध्ये असता तेव्हा गडद लिपस्टिक तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते. यावेळी शक्य तितका नैसर्गिक मेकअप ठेवावा. जेणेकरून तुमच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये वाढतील. त्यामुळे लिपस्टिकप्रमाणे डार्क शेडचे ब्लशर लावू नये.
advertisement
6/6
त्याऐवजी मऊ रंगाचे ब्लशर वापरा. हे तुमच्या एकूण मेकअपमध्ये ताजेपणा आणेल.त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही दिवसा तयार असाल तेव्हा तुमचा लूक वाढवण्यासाठी या छोट्या टिप्स फॉलो करा, असे प्रेरणा देशमुख यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
महिलांनी योग्य पद्धतीनं मेकअप कसा करावा? ‘या’ टिप्स करा फॉलो होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल