Muskmelon Buying Tricks : तुम्ही घरी आणलेलं खरबूज गोड निघालं नाही? खरेदी करताना नेमकं कसं ओळखावं?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to check sweet muskmelon : उन्हाळा सुरु झाला की, गोड आणि रसाळ फळांची बाजारामध्ये रंग लागते. त्यात कलिंगड आणि खरबूज ही दोन हंगामी फळं घेण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. मात्र कलिंगड असो किंवा खरबूज ही फळं बाहेरून आपल्याला ओळखायला येत नाही. पण यासाठी काही गोष्टी पाहून तुम्ही योग्य निवड करू शकता.
advertisement
1/7

बऱ्याचदा फ्रेश आणि चांगली दिसणारी फळं घरी आणल्यावर मात्र अगोड आणि कोरडी निघतात. पण चिंता करण्याची गरज नाही कारण या समस्येवर अचूक उपाय आज आम्ही तुम्हाला देत आहोत. काही सध्या साध्या गोष्टी तपासून तुम्ही गोड आणि रसाळ खरबूज निवडू शकता.
advertisement
2/7
सर्वात आधी बोटांच्या साहाय्याने खरबूज तपासा. खरबूजावर नैसर्गिक पट्टे असतात. या पट्ट्यांमध्ये किमान दोन बोटांचे अंतर असेल तर ते खरबूज वेलीवरच पिकलं आहे असं समजावं असे खरबूज गोड आणि रसाळ असतात.
advertisement
3/7
खरबूज बोटाने हलकं प्रेस केल्यावर ते दबलं, म्हणजे ते खरबूज पिकलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. मात्र ते हलकंसच आत जातंय ना ते तपासा. कारण ते खूप दबलं तर कुजलेलं असल्याची शक्यता जास्त आहे. असं फळ अजिबात खरेदी करू नका.
advertisement
4/7
जड खरबूजच गोड असेल असं नाही. इंस्टाग्रामवर dadecordiaries या अकाऊंटवर खरबूज अचूक पद्धत सांगितली आहे. त्यांच्यामते, खरबूज आकाराने मोठं असूनही वजनाने हलकं असेल, तर ते पिकलेले आहे. याउलट जड खरबूज बहुतेकदा आतून कच्चं असू शकतं.
advertisement
5/7
खरबूजावर तपकिरी जाळी असेल तर ते गोड असण्याची शक्यता जास्त आहे. गडद पिवळ्या किंवा गडद रंगाचे खरबूज गोड असतात. खरबूज गुळगुळीत, स्पष्ट आणि हिरवे दिसत असेल तर ते कमी गोड असू शकतं.
advertisement
6/7
गोड खरबूज ओळखण्यासाठी त्याचा सुगंध आणि देठ तपासा. खरबूजाचा सौम्य, गोड वास येत असेल तर ते रसाळ असण्याची शक्यता असते. यासोबतच देठाचा भाग सहजपणे दाबला गेला तर फळ पिकलेले आहे. मात्र देठाच्या भागात छिद्र असेल किंवा ते काळं आणि कुजलेलं दिसत असेल तर खरबूज घेऊ नये.
advertisement
7/7
खरबूजाचा तळभाग गडद असेल तर ते वेलीवर पिकलेले असण्याची शक्यता आहे. मात्र फळ पूर्ण एकसारखं पिवळं आणि चमकदार असेल तर ते पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला गेला असू शकतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Muskmelon Buying Tricks : तुम्ही घरी आणलेलं खरबूज गोड निघालं नाही? खरेदी करताना नेमकं कसं ओळखावं?