TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : रितेशने काढली राकेशची संपूर्ण 'हिस्ट्री', व्यक्त केला संताप; सगळ्यांसमोरच दाखवलं

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये राकेशचा या आठवड्यातील गेम पाहिल्यानंतर रितेशने त्याची बिग बॉस मराठीच्या घरातील संपूर्ण हिस्ट्री काढून त्याला आरसा दाखवला आहे.
advertisement
1/7
BBM 6 : रितेशने काढली राकेशची संपूर्ण 'हिस्ट्री', व्यक्त केला संताप; सगळ्यांसमोरच दाखवलं
बिग बॉस मराठी 6 मध्ये आज भाऊचा धक्का. रितेश देशमुख कुणाचं कौतुक करणार आणि कुणाची शाळा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता भाऊचा धक्काचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश राकेश बापटला सुनावताना दिसतो आहे.
advertisement
2/7
भाऊचा धक्कावर रितेशने राकेशची बिग बॉसच्या घरातील संपूर्ण हिस्ट्री काढली आहे आणि ते पाहून संतापही व्यक्त केला आहे.
advertisement
3/7
राकेश कॅप्टनी टास्कवेळी तन्वीच्या अंगावर बसला होता. याबाबत रितेशने राकेशला चांगलंच सुनावलं आहे. रितेश म्हणाला, राकेश तुम्ही त्यांच्या अंगावर जाऊन बसलात ते नाही आवडलं प्रेक्षकांना. लोक कसे रिएक्ट झालेत त्यावर.
advertisement
4/7
पुढे रितेश राकेशला म्हणतो, तुम्हाला कमेंट दाखवू मी, बघा. असं म्हणत राकेशने तन्वीसोबत केलेल्या त्या कृत्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया रितेश सगळ्यांसमोर दाखवल्याचं दिसतं आहे.
advertisement
5/7
तसंच रितेश राकेशची बिग बॉसच्या घरातील हिस्ट्रीही काढतो आणि राकेशला आरसा दाखवतो. रितेश म्हणतो, "राकेश तुमची एक हिस्ट्री आहे की तुम्ही टास्क रद्द करता", हे सांगत रितेशने राकेशला, "खेळायचं नसेल तर जाऊ नका", अशी ताकीदच दिली आहे.
advertisement
6/7
हा प्रोमा पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनीही राकेशला ट्रोल केलं आहे. राकेश या आठवड्यात चुकला, तो चुकीचा गेम खेळला अशा कमेंट त्याच्याबाबत आल्या आहेत.
advertisement
7/7
तर काही प्रेक्षकांनी राकेशला पाठिंबाही दिला आहे. विशाल करतो ते चालतं का? राकेश तू स्ट्राँग आहे, आमचा तुला पाठिंबा आहे, असं म्हणत त्याला समर्थन दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : रितेशने काढली राकेशची संपूर्ण 'हिस्ट्री', व्यक्त केला संताप; सगळ्यांसमोरच दाखवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल