TRENDING:

Pressure Cooker Tips : घरातलं कुकर बदलायची योग्य वेळ तुम्हाला माहितीये? 'या' मर्यादेनंतर बनू शकतं विषारी..

Last Updated:
What is the expiry date of pressure cooker : प्रेशर कुकर ही प्रत्येक घरात वापरली जाणारी वस्तू आहे. मात्र त्याचा वापर रोज होत असल्यामुळेच ते नेमकं किती दिवस किंवा वर्ष वापरणं सुरक्षित आहे हे आपल्याला माहित असायला हवं. आज आम्ही तुम्हाला कुकर किती दिवस वापरणं सुरक्षित असतं याबद्दल महिती देत आहोत.
advertisement
1/5
घरातलं कुकर बदलायची योग्य वेळ तुम्हाला माहितीये? 'या' मर्यादेनंतर बनू शकतं विषारी..
तुमच्या हे ध्यानी मनीही नसेल की, रोज आपण वापरत असलेलं कुकर तुमच्या शरीरात हळूहळू विष बनवू शकतो. तुम्ही अ‍ॅल्युमिनिअमचा प्रेशर कुकर वापरत असाल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवं.
advertisement
2/5
तुमचा अ‍ॅल्युमिनिअमचा प्रेशर कुकर खूप जुना झाला असेल, त्यामुळे तुमच्या अन्नात अ‍ॅल्युमिनियमचे कण मिसळू शकतात. यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
3/5
हे अ‍ॅल्युमिनियम तुमच्या रक्तात, हाडांमध्ये आणि मेंदूमध्ये जमा होऊ शकते. म्हणूनच प्रेशर कुकर किती काळ वापरावा, हे तुम्हाला माहिती असायलाच हवं. चला जाणून घेऊया.
advertisement
4/5
तुमचा अ‍ॅल्युमिनियमचा कुकर 10 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल, तर तो तुम्ही ताबडतोब बदलायला हवा. कुकर आता बदलायलाच हवा हे म्हणजेच तो बदलण्याची वेळ आली आहे हे तुम्हाला काही गोष्टींवरून कळेल.
advertisement
5/5
कुकरमध्ये ओरखडे किंवा काळे डाग दिसले, झाकण किंवा शिट्टी सैल झाली असेल, तर तुम्ही ताबडतोब कुकर बदलायला हवा. या गोष्टी त्याचेच संकेत असतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pressure Cooker Tips : घरातलं कुकर बदलायची योग्य वेळ तुम्हाला माहितीये? 'या' मर्यादेनंतर बनू शकतं विषारी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल