TRENDING:

थंड झाल्यावर पोळ्या कडक होतात ना? या 7 ट्रिक्सने दिवसभर राहतील मऊसूत

Last Updated:
How to Make Soft Chapati : तव्यावरची गरम गरम पोळी आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असते; पण कामाच्या व्यग्रतेत अनेक घरांमध्ये पोळ्या (चपात्या) आधीच करून ठेवल्या जातात; पण पोळ्या थंड झाल्यानंतर त्या कडक होतात. अशा पोळ्या जेवताना खायला चांगल्या वाटत नाहीत. अशा परिस्थितीत पोळ्या करण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील. त्यांचा वापर केल्यानंतर थंड पोळ्यासुद्धा मऊसूत राहतील.
advertisement
1/7
थंड झाल्यावर पोळ्या कडक होतात ना? या 7 ट्रिक्सने दिवसभर राहतील मऊसूत
1. पीठ चाळायला विसरू नका : गव्हाच्या पिठात कोंडा असतो. ह्या कोंड्यात पोषकतत्त्वं खूप असतात, यात शंकाच नाही; पण कोंडा असलेल्या पिठामुळे पोळ्या जाड आणि कडक होतात. अशा वेळी पीठ मळताना ते चाळणीनं चाळून घेऊन कोंडा काढून टाकावा. त्यामुळे पोळी खूप मऊ आणि पातळ होईल.
advertisement
2/7
2. पीठ मिळण्याची पद्धत : पोळी करण्यासाठी पिठाचा मळलेला गोळा अगदी मऊ असला पाहिजे. त्यात थोडं थोडं पाणी मिसळून पीठ हाताने मळावं. असंच काही वेळ मळल्यानंतर पीठ ताटात चिकटणार नाही आणि खूप मऊ होत जाईल. त्यामुळे पोळ्या उत्तम होतील. पुऱ्या करण्यासाठी पीठ जरा घट्ट मळणं चांगलं असतं. तसं केल्यास पुऱ्या छान टपोऱ्या फुगतात.
advertisement
3/7
3. पिठावर तेल लावा : पीठ मळताना, त्यात तुम्ही थोडंसं तेलही घालू शकता. यामुळं पोळ्या मऊ राहतात. तसंच पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून ठेवावं. यामुळं मळलेलं पीठ कोरडं पडणार नाही आणि पोळ्या मऊ राहतील.
advertisement
4/7
4. पोळी करण्याची पद्धत : पोळी लाटण्यासाठी पिठाचा लहान गोळा करून घ्या. नंतर त्याच्यावर कोरडं पीठ लावा आणि पोळपाटावर ठेवून लाटण्यानं पोळी लाटून घ्या. एक लक्षात ठेवा, की पोळी लाटून झाल्यानंतर लगेचच ती तव्यावर टाका. कारण पोळी जास्त वेळ पोळपाटावर तशीच ठेवली तर ती कडक होते आणि फुगत नाही.
advertisement
5/7
5. मध्यम आचेवर पोळी भाजा : तव्यावर पोळी टाकताना लक्ष ठेवा, की पोळीची कुठेही घडी पडू देऊ नका, अन्यथा अशी पोळी फुगत नाही. याशिवाय पोळी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवू शकता. अनेक जण पोळी भाजतानासुद्धा गॅस बारीक आचेवर ठेवतात; पण यामुळे पोळी कडक होऊन जाते. त्यामुळे पोळी करताना गॅस मध्यम ते मोठा अशा पद्धतीने ठेवत राहा. असं केल्यानं पोळी मऊ होईल आणि छान फुगेल.
advertisement
6/7
6. पीठ स्वच्छ करा : पोळी लाटत असताना लावायला घेतलेल्या पिठाचं प्रमाण जास्त झालं, तर ते पोळपाटावरून झटकून टाका. पोळीवर कोरडं पीठ जास्त लावलं गेलं तरीही पोळी कडक होऊ शकते. तसंच पोळी भाजताना ती तव्यावर चिकटू शकते. त्यामुळे पुढच्या पोळ्यांनासुद्धा पिवळा रंग येतो आणि त्या जळतात. मग अशा वेळी तव्यावर चिकटलेलं पीठ काढून टाकल्यानंतरच पुढची पोळी भाजायला घ्यावी.
advertisement
7/7
7. पिठात दूध मिसळा : मऊ आणि फुगलेल्या पोळ्या करण्यासाठी तुम्ही पिठात दूध मिसळू शकता. त्यामुळे पोळ्या खूपच मऊ होतात. दुधाच्या ऐवजी तुम्ही दह्याचा वापरही करू शकता. यामुळं त्या अगदीच मऊ, फुगलेल्या आणि अतिशय चविष्टसुद्धा होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
थंड झाल्यावर पोळ्या कडक होतात ना? या 7 ट्रिक्सने दिवसभर राहतील मऊसूत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल