TRENDING:

SUV नव्हे टँक! 26 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, भारतातल्या सगळ्यात स्वस्त 3 अशा SUV

Last Updated:
आता कारच्या किंमतीत एसयूव्ही विकता घेता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नाहीतर आता एसयूव्हीमध्ये दमदार फिचर्सही दिले जात आहे.
advertisement
1/8
SUV नव्हे टँक! 26 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, सगळ्यात स्वस्त 3 अशा SUV
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे आता कारच्या किंमतीत एसयूव्ही विकता घेता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात सर्वाधिक एसयूव्हीची विक्री झाल्याची नोंद आहे. एवढंच नाहीतर आता एसयूव्हीमध्ये दमदार फिचर्सही दिले जात आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीय, ऑफिसला जाणारे तरुण-तरुणी प्रामुख्याने आता एसयूव्ही खरेदीला पसंती देत आहे.
advertisement
2/8
Tata Punch - सगळ्यात आधी येते ती टाटा पंच. टाटा पंचही देशातली पहिली सुरक्षित अशी एसयूव्हीचा मान मिळवला. एवढंच नाहीतर सर्वाधिक विक्री होणारी मिड एसयूव्ही सुद्धा आहे. या एसयूव्हीची किंमत 5.50 लाखांपासून सुरू होते.
advertisement
3/8
Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा पंचचं  इंजिन 1.2L पेट्रोल आहे. यामध्ये CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. टाटा पंचच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये २०.८ किमी प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये २६.९९ किमी मायलेज देते.
advertisement
4/8
Tata Nexon - टाटा पंचनंतर सर्वाधिक सेफ आणि विक्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी टाटा नेक्सॉन आहे.  ही एक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. Tata Nexon ची किंमत   7.32 लाखांपासून सुरू होते.  Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये Tata Nexon ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.
advertisement
5/8
Tata Nexon चं इंजिन हे 1.2L टर्बो-पेट्रोल, 1.5L डिझेल असं आहे. यामध्ये EV पर्याय सुद्धा आहे.  Tata Nexon मध्ये मोठी 10.25-इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, 6 एअरबॅग्ज दिले आहे. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १७ तर डिझेल व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक २४ इतकं आहे.  
advertisement
6/8
रेनॉल्ट ट्रायबर Renault Triber ही भारतातील सर्वात परवडणारी 7-सीटर एसयूव्ही आहे. या एसयूव्हीमध्ये तीन रांगा मिळतात. मधल्या रांगेतील जागा 60:40 मध्ये फोल्ड आणि सरकवता येते. बॅक रेस्टचा कोन (Angle) देखील हलवता येतो.
advertisement
7/8
दुसरी रांग पुढे फोल्ड केल्यानंतर शेवटच्या रांगेत सहजपणे जाता येतं. जास्त सामान ठेवण्यासाठी शेवटची रांग पूर्णपणे काढता येते. मधल्या आणि शेवटच्या दोन्ही रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स चांगले आहेत. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे.
advertisement
8/8
Renault Triber मध्ये 999cc चं पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72ps पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स आहेत. ट्रायबरचं मायलेज 20kmpl आहे. या कारमध्ये 5+2 असे सीटिंग ऑप्शन आहेत. या कारमध्ये 5 मोठ्या आणि 2 लहान व्यक्ती सहज बसू शकतात. कारमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. Renault Triber चं पेट्रोल व्हेरिएंट १७ ते १८ किमी मायलेज देतं तर सीएनजी व्हेरिएंट २० किमी मायलेज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
SUV नव्हे टँक! 26 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, भारतातल्या सगळ्यात स्वस्त 3 अशा SUV
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल