TRENDING:

Kitchen Tips : भाकरी काही वेळाने कडक होते, मऊ राहण्यासाठी वाचा भन्नाट टिप्स, कारभारी होतील खुश

Last Updated:
अनेक घरांमध्ये पोळी आणि भाकरी हे पदार्थ बनवले जातात. त्यातही जर जेवणाच्या ताटात भाकरी असेल तर बऱ्याच जणांच्या पोटात दोन घास एक्स्ट्राच जातात. परंतु बऱ्याचदा भाकरी बनवून काही झाला की ती कडक होते. तेव्हा भाकरी जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
advertisement
1/5
भाकरी काही वेळाने कडक होते, मऊ राहण्यासाठी वाचा भन्नाट टिप्स, कारभारी होतील खुश
भाकरी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी भाकरीचे पीठ चांगले मळून घेणे महत्वाचे आहे. पीठ एकसंध मळून घेतले की भाकरी सहज थापता येते किंवा लाटली जाते. तसेच ती थापताना तुटत नाही.
advertisement
2/5
भाकरी तुटू नये किंवा पोळीप्रमाणे एकसारखी व्हावी म्हणून पीठ कोमट पाण्यात भिजवावे. गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्याने गव्हाची कणीक चिकट असते. मात्र ज्वारी, बाजरी आणि इतर धान्यांतही ग्लुटेनचे प्रमाण कमी असल्याने ते पीठ जास्त कोरडे असते. पण कोमट पाण्याचा वापर केल्यास पीठ एकसंध व्हायला मदत होते आणि भाकरी चांगली थापली जाते.
advertisement
3/5
अनेकदा हाताने केलेली भाकरी एकसंध होत नाही अशावेळी भाकरीचा गोळा करुन घेऊन ती चक्क पोळीसारखी पोळपाटावर पीठ घेऊन लाटल्यास ती एकसारखी आणि छान लाटली जाते.
advertisement
4/5
भाकरी भाजणे ही देखील एक प्रमुख क्रिया आहे. भाकरी भाजण्यासाठी तवा चांगला तापलेला असायला हवा. भाकरीला खालच्या बाजुने पीठ असल्याने वरुन थोडा पाण्याचा हात फिरवल्यास पीठ पीठ राहत नाही. वरच्या बाजूने भाकरी कोरडी दिसायला लागली की मग दुसऱ्या बाजुने ती बारीक गॅसवर एकसारखी भाजावी.
advertisement
5/5
गॅसवर टाकल्यानंतर भाकरी फुगली तर ती एकसारखी थापली किंवा लाटली गेली असे म्हणता येईल. पुन्हा तव्यावर भाजलेली बाजू थोडी गॅसवर भाजून घ्यायची. भाकरी भाजल्यावर ती फारकाळ मऊ ठेवायची असेल तर थोडी थंड झाल्यास सुती कपड्यात बांधून ठेवावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : भाकरी काही वेळाने कडक होते, मऊ राहण्यासाठी वाचा भन्नाट टिप्स, कारभारी होतील खुश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल