Kitchen Tricks : कितीही लसूण असो, काही मिनिटांत सोलाला जाईल! 1-2 नव्हे तर 6 भन्नाट ट्रिक्स, कोणतीही वापरा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to peel garlic fast : लसूण सोलणं हे स्वयंपाक घरातलं सर्वात अवघड काम आहे. अवघड यासाठी की त्याला खूप वेळा लागतो आणि खरं तर रोज लसूण निसनं हे खूप कंटाळवाणंही असतं. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत लसूण सोलू शकाल.
advertisement
1/9

काही लोक आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी एकदाच आलं लसूण पेस्ट बनवतात. तर काही लोक नुसता लसूण नसून ठेवतात. मात्र आठवड्यासाठी भरपूर लसूण लागतो आणि तो सोलायला खूप कष्टही लागतात. अशावेळी लसूण सोलण्याच्या काही सोप्या पद्धती आपलं काम सोपं करू शकतात.
advertisement
2/9
लसूण सोलण्याची एक पद्धत असते ती म्हणजे, एखाद्या डब्यात किंवा जरमध्ये लसूण घेऊन तो वेगाने शेक करणे. लसणाच्या पाकळ्या एका मोठ्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात टाका. झाकण घट्ट बंद करा आणि 20-30 सेकंद वेगाने डबा हलवा. असे केल्याने लसणाची साल सैल होईल आणि निघू लागेल. डबा उघडल्यावर तुम्हाला बहुतांश लसूण सोललेला मिळे. या पद्धतीने तुम्ही 10-15 मिनिटांत अंदाजे एक किलो लसूण सोलू शकते.
advertisement
3/9
दुसऱ्या पद्धतीने तुम्ही पाण्यात टाकून लसूण सोलू शकता. लसूण थोडा कोरडा किंवा जुना असल्यास ही पद्धत जास्त उपयुक्त ठरते. लसणाच्या पाकळ्या कोमट पाण्यात 8-10 मिनिटे भिजवा. पाण्याच्या उष्णतेमुळे साले मऊ होते. नंतर बोटांनी पाकळ्या हलक्या दाबा किंवा घासा. साल लगेच वेगळी होण्यास सुरुवात होईल आणि कजास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
advertisement
4/9
तिसरी पद्धतही उपयुक्त आहे. यासाठी एका चॉपिंग बोर्डवर लसणाची पाकळी घ्या. त्यावर एक रुंद चाकू आडवा ठेवा आणि तुमच्या तळहाताने हलका दाबा. पाकळी थोडी फुटेल आणि साल लगेच वेगळी होईल. मात्र हे खूप काळजीपूर्वक करा, अन्यथा दुखापत होऊ शकते.
advertisement
5/9
कोमट पाण्याव्यतिरिक्त तुम्ही थंड पाणी वापरूनही लसूण सोलू शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात एक लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यात थंड पाणी टाका. 5-6 तास किंवा रात्रभर सोडा. पाण्यात भिजवल्याने साल सैल होते. लसूण पाण्यात हाताने घासल्यासही साल सहज निघू लागते. साल पाण्यात वर येते आणि पाकळ्या तळाशी राहतात.
advertisement
6/9
ही पद्धत तशी मेहनतीची आहे. पण यामुळे वेळ वाचतो. यासाठी लसणाच्या पाकळ्या हातावर घ्या आणि त्या दोन्ही तळहाताने रगडा. घर्षणामुळे साल फुटते आणि लसूण लवकर सोलता येतो. ही पद्धत लहान लसणाच्या पाकळ्यांसाठी खूप प्रभावी आहे.
advertisement
7/9
लसूण सोलताना काही स्मार्ट टिप्स तुम्ही वापरू शकता. जसे की, लसूण सोलण्यापूर्वी तुमच्या तळहाताने लसूण हलके दाबा, यामुळे पाकळ्या अधिक लवकर वेगळ्या होतील. सोलण्यापूर्वी खूप कोरडा असलेला लसूण भिजवा. साल वेगळी करण्यासाठी तो चाळणीत हलका हलवा. हातांना त्रास होऊ नये म्हणून थोडे तेल लावा.
advertisement
8/9
एकाचवेळी खूप लसूण सोलल्यानंतर तो योग्य पद्धतीनं साठवणंही आवश्यक आहे. म्हणून सोललेल्या पाकळ्या हवाबंद डब्यात टाका आणि त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. या पद्धतीने त्या अनेक दिवस टिकतील. तुम्ही लसूण पेस्ट बनवू शकता आणि लहान भागांमध्ये ती फ्रिजरमध्ये साठवू शकता.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tricks : कितीही लसूण असो, काही मिनिटांत सोलाला जाईल! 1-2 नव्हे तर 6 भन्नाट ट्रिक्स, कोणतीही वापरा