TRENDING:

iQOO 15R चा पहिला सेल आजपासून सुरू! मिळेल 4 हजारांचं इंस्टंट डिस्काउंट

Last Updated:
आयक्यू 15R चा पहिला सेल आज 12 वाजा सुरू झाला आहे. ज्याची किंमत 44,999 रुपयांपासून आहे. स्नॅपड्रॅगन 8 जेन, 7,600mAh बॅटरी, 50MP सोनी LYT-700V कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, लॉन्च ऑफरमध्ये डिस्काउंट.
advertisement
1/7
iQOO 15R चा पहिला सेल आजपासून सुरू! मिळेल 4 हजारांचं इंस्टंट डिस्काउंट
आयक्यूच्या नवीन मिड-फ्लॅगशिप स्मार्टफोन आयक्यू 15R चा पहिला सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झाला आहे. फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन कंपनीच्या लाइनअपमध्ये प्रीमियम मॉडलच्या खाली ठेवला आहे. मात्र याचे फीचर्स याला फ्लॅगशिप सारखा परफॉर्मेंस देणारा डिव्हाइस बनवतात. विशेषतः याची मोठी बॅटरी आणि लेटेस्ट चिपसेट याला या सेगमेंटमध्ये वेगळी ओळख देतात.
advertisement
2/7
किंमत आणि लॉन्च ऑफर्स - आयक्यू 15R ची किंमत 44,999 रुपयांपासून सुरु होते. ज्यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. 12GB + 256GB व्हेरिएंट 47,999 रुपयांमध्ये आणि 12GB + 512GB व्हेरिएंट 52,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
3/7
लॉन्च ऑफरमध्ये HDFC आणि Axis Bank कार्डवर 4,000 रुपयांचं इंस्टंड डिस्काउंट समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, कंपनी iQoo/Vivo TWS (₹1,899 किमतीचे) मोफत बंडल म्हणून देत आहे. हा फोन Amazon, iQoo इंडिया स्टोअर आणि Vivo च्या ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे डार्क नाइट आणि ट्रायम्फ सिल्व्हर रंगांच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
4/7
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस : फोनमध्ये 6.59-इंचाचा 1.5K (1,260 x 2,750 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट, 5,000 निट्स लोकल पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि 4,320Hz PWM डिमिंग सपोर्ट करते.
advertisement
5/7
हे स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसरसह येते. जे LPDDR5x RAM आणि UFS 4.1 स्टोरेजसह जोडले गेले आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 826 GPU मिळते. स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर बेस्ड OriginOS 6 वर चालतो आणि कंपनीने 4 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट आणि 6 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटचं वचन दिलं आहे.
advertisement
6/7
कॅमेरा आणि बॅटरी : कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी LYT-700V प्रायमरी सेन्सर (OIS सह) आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
advertisement
7/7
पॉवरसाठी फोनमध्ये 7,600mAh ची मोठी बॅटरी आहे. जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 6, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो.आयक्यू 15R पॉवरफूल परफॉर्मेंस, दीर्घ बॅटरी लाइफ आणि प्रीमियम डिस्प्लेसह मिड-फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये मजबूत दावेदार म्हणून समोर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iQOO 15R चा पहिला सेल आजपासून सुरू! मिळेल 4 हजारांचं इंस्टंट डिस्काउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल