1 मार्चपासून लागू झाला व्हॉट्सअॅप चालवण्याचा नवा नियम! तुमच्या फोनवर काय परिणाम होणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
1 मार्चपासून भारतात WhatsApp, Telegram, Signal सह मॅसेजिंग अॅप्सवर सीम-बाइंडिंग नियम लागू झाले आहेत. डिजिटल सुरक्षेसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. पाहा याचा तुमच्यावर काय परिणाम होईल.
advertisement
1/6

मुंबई : 1 मार्चपासून भारतात मॅसेजिंग अॅप्सच्या वापाराची पद्धत बदलणार आहे. यूझर्सला कंफर्म करावे लागेल की, त्यांचं रजिस्टर्ड सिम नेहमी अॅक्टिव्ह राहायला हवं आणि डिव्हाइसमध्ये उपलब्ध राहावं. खरंतर भारतात वेगाने सायबर फ्रॉड आणि डिजिटल फसवणुकीचे प्रकरणं वाढत आहेत. यामुळेच सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. आता देशात वापर होणाऱ्या प्रमुख मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सला कठोर SIM-बाइंडिंग नियमांचं पालन करावं लागेल.
advertisement
2/6
दूरसंचार विभागाने (DoT) व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अरत्ताई आणि जोश यासारख्या अनेक अ‍ॅप कंपन्यांना अधिकृतपणे निर्देश दिले आहेत की त्यांच्या सेवा संबंधित मोबाइल डिव्हाइसमध्ये रजिस्टर्ड सिम कार्ड असल्यास आणि अॅक्टिव्ह असल्यासच कार्य करतील.
advertisement
3/6
हा आदेश टेलिकॉम सायबर सिक्युरिटी (TCS) नियम, 2024 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. कंपन्यांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती, जी 28 फेब्रुवारी रोजी संपत आहे आणि हा नवीन नियम आज, 1 मार्चपासून लागू होईल. सिम-स्वॅप घोटाळे, बनावट ओळखपत्रे आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
advertisement
4/6
1 मार्चपासून काय बदललं? : तुम्ही रजिस्टर्ड सिम मोबाईलमधून काढलं, बदललं किंवा डिअॅक्टिव्ह झालं, तर संबंधित अॅप त्या डिव्हाइसवर काम करणं बंद करेल. योग्य सिम पुन्हा टाकून ऑथेंटिकेशन केल्यावर ही सर्व्हिस पुन्हा एकदा सुरु होईल. व्हॉट्सअॅप वेब आणि टेलिग्राम सारख्या वेब/डेस्कटॉप व्हर्जन दर 6 तासांनी ऑटो-लॉगआउट होतील.पुन्हा लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला अॅक्टिव्ह सिम असलेल्या फोनवरून QR कोड स्कॅन करावा लागेल.
advertisement
5/6
सरकारचा हेतू काय? : सरकारनुसार, ही व्यवस्था यूझर्सची ओळख मजबूत करणे आणि मेसेजिंग अॅप्सच्या ट्रेसबिलिटी वाढवण्यासाठी लागू केली जात आहे. संचार मंत्री Jyotiraditya Scindia यांनी स्पष्ट केलंय की, डेडलाइन पुढे वाढवली जाणार नाही आणि डिजिटल सुरक्षेसाठी हे आवश्यक पाऊल आहे.
advertisement
6/6
इंडस्ट्रीची चिंता : इंडस्ट्री संघटनांनी शक्यता वर्तवली आहे की, यामुळे अशा यूझर्सला असुविधा होऊ शकते. जे मल्टी-डिव्हाइसचा वापरकरतात किंवा वारंवार प्रवास करतात. खरंतर सरकार मानते की, सुरक्षेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे आणि या नियमामुळे सायबर सुरक्षा चौकट मजबूत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
1 मार्चपासून लागू झाला व्हॉट्सअॅप चालवण्याचा नवा नियम! तुमच्या फोनवर काय परिणाम होणार?