TRENDING:

हिलेरी क्लिंटन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ, अँटिलियात नीता-मुकेश अंबानींनी केला खास पाहुणचार

Last Updated:
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अँटिलिया येथे हिलेरी क्लिंटन यांना मेजवानी दिली. भारतीय कला, संगीत आणि संस्कृतीचा संगम साधला गेला. ईशा अंबानीही उपस्थित होती.
advertisement
1/6
हिलेरी क्लिंटन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ, अँटिलियात अंबानींनी केला पाहुणचार
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांची मुंबईतील आपल्या अँटिलिया या निवासस्थानी मेजवानी केली. यावेळी कला, संस्कृती आणि मैत्रीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. या भेटीदरम्यान ईशा अंबानी देखील उपस्थित होती.
advertisement
2/6
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने सोशल मीडियावर या खास भेटीचे फोटो शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये नीता अंबानी ‘अतिथि देवो भव:’ म्हणत हिलेरी क्लिंटन यांचे स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी नीता अंबानी यांनी क्लिंटन यांना आपल्या घराची आणि घरातील भव्य मंदिराची सफर घडवली.
advertisement
3/6
भारतीय हस्तशिल्प कलेचा वारसा असलेल्या 'गुलाबी मीनाकारी' आणि 'सोजनी भरतकाम' यांसारख्या कलाकुसरीची माहितीही त्यांना देण्यात आली. या खास भेटीदरम्यान भारतीय शास्त्रीय संगीताची मैफलही जमली होती.
advertisement
4/6
हिलेरी क्लिंटन यांनी नीता अंबानींसोबत बसून सितार वादनाचा आनंद लुटला. दोन्ही महिला नेत्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. ही संध्याकाळ केवळ एक औपचारिक भेट नसून, ती कला आणि संस्कृतीबद्दलच्या प्रेमाचा एक उत्सव ठरली.
advertisement
5/6
अंबानींच्या भेटीपूर्वी हिलेरी क्लिंटन यांनी मुंबईत आयोजित पहिल्या क्लायमेट वीक मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना त्यांनी हवामान बदलाच्या लढाईत भारताच्या नेतृत्वाचे मुक्तकंठाने कौतुक केले.
advertisement
6/6
'क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह'च्या माध्यमातून त्या अशा भागीदारांच्या शोधात आहेत जे हवामान बदलासारखी कठीण आव्हाने पेलण्यासाठी आणि मोठे बदल घडवण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबईतील हा 'क्लायमेट वीक' म्हणजे व्यापक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
हिलेरी क्लिंटन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ, अँटिलियात नीता-मुकेश अंबानींनी केला खास पाहुणचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल