सरकारला शक्तिपीठ महामार्ग का करायचा आहे? राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप, २०२९ साली...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलून सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातून महामार्ग नियोजित करण्यात आला आहे.
advertisement
1/5

असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा विरोध सुरू केला आहे.शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्या, अशी उद्विग्न मागणी शेतकऱ्यांनी केली.
advertisement
2/5
विधानसभा 2029 च्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
advertisement
3/5
गरज नसताना नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलून सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग नियोजित करण्यात आला आहे. नव्या रेखांकनामुळे 65 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे.
advertisement
4/5
वाळवा तालुक्यातून नियोजित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून सांगलीच्या ईश्वरपुर मध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
advertisement
5/5
वाळवा आणि शिराळा तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करत तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. मविआसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सरकारला शक्तिपीठ महामार्ग का करायचा आहे? राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप, २०२९ साली...