Kitchen Hacks : फ्रिज नसलं म्हणून काय झालं, 'या' ट्रिकने उन्हाळ्यातही नासणार नाही दूध! जास्तकाळ टिकेल
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात घरातले अन्नपदार्थ जास्त जपावे लागतात. कारण या ऋतूमध्ये अन्न फारकाळ चांगलं राहात नाही. ते लवकर खराब व्हायला लागतं किंवा दूध असेल तर ते नासतं म्हणजेच फाटतं. अशावेळी काही सोप्या ट्रिक्सने ते सांभाळता येऊ शकतं.
advertisement
1/7

उष्ण वातावरणामध्ये कोणताही पदार्थ लवकर खराब होतो त्यातही तो ओला असेल तर आणखी लवकर खराब होतो. दूध तर उन्हाळ्यात जपणं फार अवघड असतं. फ्रिज असेल तर दुधाची चिंता नसते. पण जर फ्रिज नसेल दूध टिकवणं थोडं अवघड होतं. पण चिंता करू नका. कारण यावरही काही उपाय आहेत.
advertisement
2/7
उन्हाळ्यात दूध जास्तकाळ टिकवण्यासाठी तुम्ही ओल्या कापडाचा वापर करू शकता. उन्हाळ्यात दूध तापवल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि त्यानंतर त्यावर व्यवस्थित झाकण ठेवा. झाकण ठेवल्यानंतर एक ओला कापड घ्या आणि तो दुधाच्या पातेल्याभोवती गुंडाळा. हे दुधाचं पातेलं आता हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून ते बराचकाळ थंड राहील.
advertisement
3/7
उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून ते थंड पाण्यामध्ये ठेवता येऊ शकते. दुध तापवल्यानंतर ते थंड होऊ द्या, एकदा पातेलं थंड झालं की ते पटेल आणि असलेल्या एका मोठ्या ताटामध्ये ठेवा. दुधाचं पातेलं थंड पाण्यात ठेवल्यामुळे दुधाचं तापमान कमी राहतं. ज्यामुळे जिवाणूंची वाढ स्लो होते.
advertisement
4/7
दूध जास्तकाळ टिकावं यासाठी काही लोक उकळत्या दुधात चिमूटभर खाण्याचा सोडा टाकतात. काही लोक दूध उकळताना त्यात चिमूटभर मीठ घालतात. यामुळेही दूध फ्रिजशिवाय जास्तकाळ टिकतं असं म्हणतात. मिठातील जिवाणूनाशक गुणधर्म दूध खराब करणाऱ्या जिवाणूंची वाढ कमी करतात. ज्यामुळे दूध फ्रेश राहातं.
advertisement
5/7
दूध नासू नये यासाठी जसे दूध तापल्यानंतर युक्त्या केल्या जातात, त्याचप्रमाणे आधीही स्वच्छ जास्त महत्त्वाची आहे. ज्या पातेल्यात आपण दूध तापवतो ते स्वच्छ धुतलेलं असावं. कारण भांडं अस्वच्छ असेल आणि त्यामध्ये आधी काही लागलेलं असेल तर त्यावर जिवाणू असण्याची शक्यताब जास्त असते. या जिवाणूंमुळे दूध लवकर नासतं.
advertisement
6/7
दुधाला चांगलं राहण्यासाठी एकतर थंड किंवा मग गरम असावं लागतं. म्हणून जर फ्रिज नसेल तर तुम्हाला दूध दर 5-6 तासांनी उकळावं लागेल. दूध जास्त काळ चांगलं ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : फ्रिज नसलं म्हणून काय झालं, 'या' ट्रिकने उन्हाळ्यातही नासणार नाही दूध! जास्तकाळ टिकेल