King Cobra : सापांचा राजा असला तरी… 'या' 5 प्राण्यांना घाबरतो किंग कोब्रा, कोण आहेत सर्वात मोठे शत्रू?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
निसर्गाने काही प्राण्यांना अशा काही शक्ती दिल्या आहेत की, त्यांच्यासमोर कोब्राचं विषही टिकू शकत नाही. चला तर मग, त्या 5 महाभयंकर शिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
1/8

आपण सहसा पावसाळ्यात किंवा शेतात फिरायला गेलो की, सर्वात मोठी भीती कशाची वाटते? तर ती म्हणजे सापाची. त्यातही जर समोर साक्षात नाग फणा काढून उभा असेल, तर भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. कोब्रा हा जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापांपैकी एक मानला जातो. इतर सापांच्या तुलनेत कोब्राचं विष खूपच धोकादायक आहे. त्याच्या एका दंशात एका हत्तीला मारण्याइतकं विष असतं. पण तुम्हाला माहीत आहे का? निसर्गाचं चक्र इतकं अजब आहे की, ज्या कोब्राला पाहून आपण पळ काढतो, त्याच कोब्राची शिकार करणारे काही प्राणी या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.
advertisement
2/8
निसर्गाने काही प्राण्यांना अशा काही शक्ती दिल्या आहेत की, त्यांच्यासमोर कोब्राचं विषही टिकू शकत नाही. चला तर मग, त्या 5 महाभयंकर शिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
3/8
मुंगूस : नागाचा सर्वात मोठा काळ लहानपणापासून आपण मुंगूस आणि सापाच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. मुंगूस हा कोब्राचा सर्वात कट्टर शत्रू मानला जातो. कोब्रा कितीही विषारी असला तरी मुंगूस त्याला अजिबात भीत नाही. मुंगसाचा वेग इतका जास्त असतो की कोब्राला डंख मारण्याची संधीच मिळत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंगसाच्या शरीरातील रिसेप्टर्स सापाच्या विषाला प्रतिरोध करतात, त्यामुळे कोब्राने चावा घेतला तरी मुंगसाला फारसा फरक पडत नाही.
advertisement
4/8
सेक्रेटरी बर्ड : लाथ मारून डोकं फोडणारा पक्षीहा पक्षी आफ्रिकेत आढळतो आणि तो आपल्या लांब पायांसाठी प्रसिद्ध आहे. जमिनीवर सरपटणाऱ्या कोब्रासाठी हा पक्षी म्हणजे साक्षात मृत्यूच असतो. हा पक्षी इतक्या जोरात कोब्राच्या डोक्यावर लाथ मारतो की सापाची कवटी एका फटक्यात फुटते. कोब्राला पलटवार करण्याची साधी संधीही हा पक्षी देत नाही.
advertisement
5/8
मगर : पाण्याचा राजाजर चुकून एखादा कोब्रा पाण्याच्या साठ्याजवळ गेला आणि तिथे मगर असेल, तर सापाचा खेळ खल्लास समजा. मगरीची त्वचा इतकी जाड असते की तिथे सापाचा विषारी दात पोहोचूच शकत नाही. मगर आपल्या जबड्यात कोब्राला पकडून काही सेकंदात त्याचे तुकडे करून चघळू शकते.
advertisement
6/8
हनी बॅजर : जगातील सर्वात निर्भीड प्राणीगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार हनी बॅजर हा जगातील सर्वात शूर प्राणी आहे. हा प्राणी दिसायला छोटा असला तरी तो थेट कोब्रावर हल्ला करतो. याची त्वचा इतकी जाड आणि घट्ट असते की सापाचे दात त्यात घुसत नाहीत. जर कोब्राने याला चावा घेतलाच, तर हनी बॅजर काही वेळ बेशुद्ध पडतो आणि पुन्हा उठून त्याच कोब्राला खाऊन टाकतो.
advertisement
7/8
गरुड आणि घार : आकाशातून येणारी आफतजमिनीवर कोब्रा कितीही ताकदवान असला, तरी आकाशात उडणाऱ्या गरुडाच्या तीक्ष्ण नजरेतून तो वाचू शकत नाही. गरुडाचे पंजे अतिशय मजबूत आणि अणकुचीदार असतात. तो उंचावरून झेप घेतो आणि कोब्राला मध्यभागी पकडून थेट आकाशात नेतो. हवेतच सापाचे तुकडे करून तो आपली भूक भागवतो.
advertisement
8/8
निसर्गाचा हा समतोल खरोखरच थक्क करणारा आहे. कोब्रा कितीही विषारी असला तरी तो निसर्गाच्या या अन्नसाखळीचा एक भाग आहे. वर उल्लेख केलेले प्राणी हे सिद्ध करतात की, शक्तीपेक्षा युक्ती आणि निसर्गदत्त वैशिष्ट्ये नेहमीच वरचढ ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
King Cobra : सापांचा राजा असला तरी… 'या' 5 प्राण्यांना घाबरतो किंग कोब्रा, कोण आहेत सर्वात मोठे शत्रू?