Cauliflower : फ्लॉवरमध्ये लपलेत किडे, नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीयेत; सोपी ट्रिक, न धुता आपोआप सगळे बाहेर येतील
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cauliflower Cleaning Tip : किडे जावेत म्हणून आपण फ्लॉवर खूप वेळा धुवून घेतो. पण आम्ही तुम्हाला अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे फ्लॉवर न धुता त्यातील किडे आपोआप बाहेर येतील.
advertisement
1/7

फ्लॉवरची भाजी चवीला चांगली लागते. पावभाजीमध्ये हमखास टाकली जाणारी ही भाजी. पण त्याची एक समस्या म्हणजे त्याच्या आत किडे असतात. फ्लॉवर पांढरा असतो आणि त्याच्या आतील किडेही अगदी तसेच असतात.
advertisement
2/7
हे किडे अगदी बारीक असतील तर काही वेळा ते नुसत्या डोळ्यांनी दिसतही नाहीत. त्यामुळे आपण फ्लॉवर खूप वेळा धुवून घेतो. पण आम्ही तुम्हाला अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे फ्लॉवर न धुता त्यातील किडे आपोआप बाहेर येतील.
advertisement
3/7
सगळ्यात आधी म्हणजे फ्लॉवर किंवा फुलकोबी खरेदी करताना तो खूप बंद किंवा पिवळा नसेल असा घ्या. नेहमी ताजा, पांढरे आणि किंचित उघडलेलला फुलकोबी निवडा घ्या. कारण याच्या आत हवा आतील थरांपर्यंत पोहोचलेली असते आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.
advertisement
4/7
आता हा फुलकोबी स्वच्छ कसा करायचा, तर त्याचे लहान तुकडे करा. प्रत्येक फुल वेगळं करा. एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या, ते जास्त गरम नसावं नाहीतर फ्लॉवर विरघळू शकतो.
advertisement
5/7
या कोमट पाण्यात एक चमचा मीठ आणि थोडी हळद टाका. हळदीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात आणि मिठामुळे कीटक वर तरंगतात. या पाण्यात फ्लॉवर सुमारे 15-20 मिनिटं तसाच भिजत ठेवा. लवकरच तुम्हाला किडे पृष्ठभागावर आलेले दिसतील.
advertisement
6/7
आता फ्लॉवर एका चाळणीत ओता आणि स्वच्छ पाण्याने दोन - तीन वेळा चांगला धुवा. यामुळे सर्व हळद आणि मीठ निघून जाईल आणि कोबी पूर्णपणे स्वच्छ होईल.
advertisement
7/7
जर तुम्हाला सुरक्षित पद्धत वापरायची असेल तर तुम्ही हळद आणि मिठात थोडं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळू शकता. यामुळे किडे पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते आणि भाजीपाल्यामध्ये असलेले कोणतेही बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cauliflower : फ्लॉवरमध्ये लपलेत किडे, नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीयेत; सोपी ट्रिक, न धुता आपोआप सगळे बाहेर येतील