Chef Kitchen Tips : तुम्ही चुकीच्या पद्धतीने ठेवताय अंडी; शेफ रणवीर बरारने सांगितली योग्य पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Store Eggs : आता तुम्ही म्हणाल अंडं ठेवण्याची पद्धत यात काय रॉकेट सायन्स आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल शेफ रणवीर ब्रार यांनी अंड कसं ठेवायचं, त्याची योग्य पद्धत आणि त्यामागील कारणही सांगितलं आहे.
advertisement
1/5

अंडा कित्येकांच्या नाश्त्याचा तो भाग. ब्रेकफास्टला ऑमलेट, अंडा भुर्जी पाव असतो. डब्यालाही झटपट होणारे असे अंड्याचे पदार्थ. जिमला जाणारे लोक दररोज उकडलेली अंडी खातात. अशी ही अंडी बहुतेकांच्या घरी आणून ठेवलेली असतात.
advertisement
2/5
सामान्यपणे अंडं कसं बनवायचं, कसं उकडायचं, कसं शिजवायचं याबाबत प्रश्न विचारले जातात. सोशल मीडियावरही याबाबत बरेच व्हिडीओ आहेत. पण अंड शिजवण्यासोबत ते ठेवण्याची पद्धतही माहिती असली पाहिजे.
advertisement
3/5
शेफ रणवीर बरारने अंडं कसं ठेवायचं, त्याची योग्य पद्धत आणि त्यामागील कारणही सांगितलं आहे. शेफ रणवीरने सांगितल्यानुसार अंड्याचे दोन भाग असतात एक चोचीकडचा भाग आणि एक गोलाकार भाग. सामान्यपणे बहुतेक लोक गोल भाग खाली आणि चोचीकडचा भाग वर करून ठेवतो.
advertisement
4/5
पण खरंतर गोलाकार भाग वर आणि चोचीकडचा भाग खाली असं ठेवायचं. अंडं जुनं झालं की त्यात हवा बनते आणि ती गोलाकार भागाकडे येते. अंड्यात या हवेने इंटरफेअर करून नये म्हणून अशा पद्धतीने अंडं ठेवावं.
advertisement
5/5
शेफ रणवीर ब्रार यांनी अंडं ठेवण्याची पद्धत दाखवल्यानंतर आपल्यापैकी जवळपास सगळे जण आतापर्यंत अंडं चुकीच्या पद्धतीने ठेवत होते, हेच दिसून येतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : तुम्ही चुकीच्या पद्धतीने ठेवताय अंडी; शेफ रणवीर बरारने सांगितली योग्य पद्धत