कॉफी प्यायला आणि थेट रुग्णालयात पोहोचला; कामातून गेलं लिव्हर, डॉक्टरांनी सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Herbal Coffee Cause Liver Problem : या व्यक्तीच्या लिव्हरच्या कार्य बिघडलं, तपासणी केली असता ही व्यक्ती आठवडाभर दररोज 2-3 कप कॉफी पित असल्याचं तिने सांगितलं आणि हेच लिव्हर बिघाडाचं कारण ठरलं. आता हे कसं काय? ते डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
1/8

जगभरात कुणी चहाप्रेमी आहेत, तर कुणी कॉफी लव्हर. काही चहा चांगला नाही म्हणून काही जण कॉफीला हेल्दी ऑप्शन समजून त्याकडे वळतात. अशीच एक व्यक्ती जिने कॉफी प्यायला सुरुवात केली. पण त्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/8
डॉ. सिरियाक अ‍ॅबी फिलिप्स जे सोशल मीडियावर द लिव्हरडॉक म्हणून ओळखले जातात, त्यांनी हे प्रकरण सोशल मीडियावर शेअर केलं आहे आणि लोकांना सावध केलं आहे. त्यांनी सागितलं की पिवळे डोळे, गडद रंगाची लघवी, त्वचेला तीव्र खाज असलेला रुग्ण रुग्णालयात आला. डॉक्टरांनी रुग्णाला दारू किंवा काही औषधं घेतली का विचारलं, कोणता व्हायरसचा संसर्ग झालाय हेसुद्धा तपासलं. पण यापैकी काहीच नाही. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/8

4/8
शेवटी रुग्णाने सांगितलं की त्याने त्याच्या रूममेटकडून चिनी जास्मिन कॉफी घेतली होते. डियान एर वा ब्रँडची ही कॉफी, हे एक इन्स्टंट हर्बल पावडर ड्रिंक, हर्बल टी आहे. जी आठवडाभर तो दिवसातून 2-3 कप पित होता. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
5/8
तपासणीत असं दिसून आलं की जास्मिन अशा लेबल असलेल्या अनेक वनस्पती खऱ्या जास्मिन (जास्मिनम सॅम्बॅक किंवा ग्रँडिफ्लोरम) नसून रात्री फुलणारी जास्मिन (सेस्ट्रम नॉक्टर्नम), पिवळी जेस्मिन (जेल्सेमियम सेम्परविरेन्स), स्टार जास्मिन इत्यादी विषारी प्रजाती आहेत. या वनस्पतींमध्ये स्टेरॉइडल ग्लायकोसाइड्स असतात, जे व्हिटॅमिन डी3 सारखं कार्य करतात आणि शरीराला कॅल्शियमची उपलब्धता वाढवतात, ज्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाला गंभीर नुकसान होतं. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
6/8
डॉक्टरांनी सांगितलं चमेली लहान डोसमध्ये सुरक्षित आहे, पण बनावट वनस्पती असलेले उत्पादने अत्यंत धोकादायक आहेत. हे उत्पादन अनियंत्रित होतं, म्हणजेच त्यात विशिष्ट वनस्पती निश्चित करण्यासाठी त्याची चाचणी घेण्यात आली नव्हती. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
7/8
रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं त्याच्या टेस्ट करण्यात आल्या तेव्हा त्याचं लिव्हरचं कार्य खूप खराब झाल्याचं निदान झालं. रुग्णाला गंभीर हिपॅटायटीस आणि कावीळ झाला होता. रुग्णावर औषधोपचार करण्यात आले आता तो बरा होत असल्याची माहिती आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
8/8
डिसेंबर 2025 मध्ये TheLiverDoc ने सोशल मीडियावर हे प्रकरण शेअर केलं तेव्हा व्हायरल झालं. पोस्टमध्ये, त्यांनी इशारा दिला, "विदेशी हर्बल ड्रिंकपासून दूर रहा. यामुळे आरोग्याला फायदे होत असल्याचा केला जातो पण सुरक्षिततेची चाचणी केलेली नसते" (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कॉफी प्यायला आणि थेट रुग्णालयात पोहोचला; कामातून गेलं लिव्हर, डॉक्टरांनी सांगितलं कारण