काळी पाल खरंच विषारी असते? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती, प्रत्येकाला ती माहित असायलाच हवी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याच लोकांच्या मनात एक शंका असते की काळी छिपकली म्हणजे विषारी आणि चुकून तिने चावलं तर जीवाला धोका तर नाही ना? पण ही भीती कितपत खरी आहे?
advertisement
1/8

आपल्या घराच्या भिंतीवर किंवा छतावर हमखास आपल्याला पाल फिरताना दिसते, त्यामुळे त्याच नवीन असं काही नाही. सहसा पाल आपल्याला स्वयंपाकघरात फिरताना दिसते. पण जेव्हा या घरगुती पिवळ्या रंगाच्या पाल ऐवजी घरात काळ्या रंगाची पाल येते, तेव्हा मात्र लोक खूप घाबरतात.
advertisement
2/8
बऱ्याच लोकांच्या मनात एक शंका असते की काळी छिपकली म्हणजे विषारी आणि चुकून तिने चावलं तर जीवाला धोका तर नाही ना? पण ही भीती कितपत खरी आहे?
advertisement
3/8
न्यूज 18 च्या टीमने मेरठ येथील चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या विषविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यशवेंद्र वर्मा यांनी स्पष्ट सांगितलं की, भारतात घरात दिसणाऱ्या पाल मग त्या पिवळ्या असोत की काळ्या किंवा चॉकलेटी त्या मुळातच विषारी नसतात. या पाल सापांप्रमाणे धोकादायक नसतात आणि सहज कुणाला चावतही नाहीत.
advertisement
4/8
तरीही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी लागेल साप चुकून जर अन्नपदार्थात पडली तर ते अन्न खाणं धोकादायक ठरू शकतं. डॉ. वर्मा यांच्या मते, अशा वेळी फूड पॉइझनिंगचा धोका संभवतो. त्यामुळे नेहमी अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि काही संशयास्पद वाटल्यास ते खाणं टाळावं.
advertisement
5/8
डॉ. वर्मा सांगतात की, भारतात आढळणाऱ्या पाल सुरक्षित असल्या तरी दक्षिण अमेरिकेत ‘गिला मॉन्स्टर’ आणि मेक्सिकोमधील ‘मेक्सिकन बीडेड लिझार्ड’ या प्रजाती अत्यंत विषारी असतात. भारतातसुद्धा काही दुर्गम जंगलांत विशिष्ट प्रकारच्या पाल आढळतात, ज्या घातक ठरू शकतात, पण त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतात.
advertisement
6/8
पाल चावली तर काय करावं?तसं पाहाता पाल चावणं दुर्मीळ आहे, पण असं असलं तरी घाबरू नका. डॉ. वर्मा सल्ला देतात की, त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो, त्यामुळे त्वरीत डॉक्टरांना दाखवावं.
advertisement
7/8
काय खबरदारी घ्यावी?अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवाघरात स्वच्छता राखा, विशेषतः किचन आणि कोपऱ्यांमध्येजास्त छिपकल्या दिसत असतील तर कीटकनाशक उपाय कराजंगलात जाताना अधिक सावधगिरी बाळगात्वचेसंबंधी त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
काळी पाल खरंच विषारी असते? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती, प्रत्येकाला ती माहित असायलाच हवी