TRENDING:

वजन करतं कमी, रक्ताची कमतरता काढतं भरून; हिवाळ्यात गूळ गुणकारी!

Last Updated:
मागील काही आठवडे प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर आपण थंडीची आतुरतेने वाट बघत होतो. थंडी पडायला सुरुवात झाली आणि त्यात पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील गारवा प्रचंड वाढला आहे. हिवाळ्यात गूळ खाणं शरिरासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे थंडीत गुळाची मागणी वाढते.
advertisement
1/5
वजन करतं कमी, रक्ताची कमतरता काढतं भरून; हिवाळ्यात गूळ गुणकारी!
जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होतं असं म्हणतात. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
advertisement
2/5
दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गॅस आणि मळमळ होत नाही.
advertisement
3/5
गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन बी आणि फायबर इत्यादी पोषक तत्त्व आढळतात.
advertisement
4/5
गुळामुळे थंडीत शरिराला उष्णता मिळते. शिवाय यात असलेल्या कॅल्शियममुळे सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यापासून सुटका मिळते.
advertisement
5/5
गुळात लोहाचं प्रमाण मुबलक असल्याने त्याचं दररोज सेवन केल्यास शरिरातली रक्ताची कमतरता भरून निघते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
वजन करतं कमी, रक्ताची कमतरता काढतं भरून; हिवाळ्यात गूळ गुणकारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल