Kitchen Jugaad : अशाप्रकारे साठवाल तर बटाट्यांना फुटणार नाही कोंब आणि महिनाभर राहतील फ्रेश..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Store Potatoes : बटाटे आपण सर्वजण रोज वापरतो. जेव्हा कोणती भाजी करावी हे सूचना नाही तेव्हा आपण पटकन बटाट्यांची भाजी बनवतो. बटाट्यांची भाजी, पराठे आणि इतर स्नॅक्स म्हणून बनवले जाणारे पदार्थ सर्वांनाच खूप आवडतात. यामुळेच लोक अनेकदा बाजारातून जास्त बटाटे आणतात आणि साठवतात. परंतु, अनेक वेळा ते योग्य प्रकारे न साठवल्याने त्याला कोंब फुटतात किंवा ते लवकर खराब होऊ लागतात.
advertisement
1/8

बटाटे अनेक घरांमध्ये साठवले जातात, जेणेकरून गरजेनुसार ते बाजारातून पुन्हा पुन्हा आणावे लागू नयेत. पण ते साठवण्याच्या पद्धती फार कमी लोकांना माहीत आहेत. तुम्हालाही तुमच्या घरात बटाटे दीर्घकाळ साठवायचे असतील तर काही पद्धती तुमचा त्रास कमी करू शकतात.
advertisement
2/8
बटाटे ओलसर ठिकाणी ठेवणे टाळा. तसेच त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादीमध्ये बांधून ठेवू नये. बटाटे ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. बटाटे फ्रीजमध्येही ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, जे आरोग्यासाठी घातक आहे.
advertisement
3/8
जर तुम्हाला <a href="https://news18marathi.com/lifestyle/">बटाटे जास्त काळ साठवायचे</a> असतील तर बटाटे ठेवण्यापूर्वी खराब झालेले किंवा डागलेले वेगळे करा, कारण एका कुजलेल्या बटाट्यामुळे इतर बटाटेही खराब होऊ शकतात.
advertisement
4/8
<a href="https://news18marathi.com/lifestyle/icmr-cooking-guidelines-what-is-correct-method-of-cooking-see-guidelines-given-by-icmr-mhpj-1181620.html">साठवण्यापूर्वी बटाटे धुणे टाळा.</a> कारण त्यात थोडासा ओलावाही सोडला तर बटाटे लवकर खराब होतात. जर तुमच्याकडे आधीच बटाटे असतील आणि बाजारातून नवीन बटाटे देखील घेतले असतील तर ते जुन्या बटाट्यांपासून वेगळे ठेवा. त्यामुळे जुने बटाटे वापरणेही सोपे होईल.
advertisement
5/8
हिरवी औषधी वनस्पती तुम्हाला बटाटे ताजे ठेवण्यास आणि त्यामध्ये कोंब न फुटण्यास मदत करू शकते. एखादी पिशवी घ्या त्यात हर्ब्स ठेवा आणि यानंतर त्यात बटाटे भरून ठेवा. यामुळे बटाटे लवकर खराब होणार नाही.
advertisement
6/8
सफरचंद, संत्री, अन्य फळे किंवा कांद्यासोबत बटाटे ठेवू नका. कांदे आणि सफरचंद इथिलीन वायू उत्सर्जित करतात, ज्यामुळे कोंब येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. काही अभ्यासांमध्ये सफरचंद बटाट्यांसोबत ठेवल्याने ठेवल्याने कोंब फुटण्याचा वेळ वाढल्याचे दिसले. म्हणून जास्त पाणीदार फळे आणि कांदे बटाट्यांसोबत स्टोअर करणे टाळा.
advertisement
7/8
कोणतीही गोष्ट कायमची टिकत नसते, त्यामुळे बटाटेही विशिष्ठ काळानंतर खराब व्हायला सुरुवात होणारच. साधारणपणे बटाट्यांना 30 ते 140 दिवसांनी नैसर्गिकरित्याच कोंब फुटण्यास सुरुवात होते. बटाट्याला कोंब आल्याचे दिसल्यास वेळीच तो कापून टाका आणि असे बटाटे लवकरच वापरून टाका.
advertisement
8/8
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad : अशाप्रकारे साठवाल तर बटाट्यांना फुटणार नाही कोंब आणि महिनाभर राहतील फ्रेश..