Kiwi Benefits : डेंग्यूच्या रुग्णांसाठी वरदान आहेत ही लहान फळं, खाल्ल्यावर आजार जातील पळून
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
डेंग्यूचा आजार बरा करण्यासाठी, रुग्णांना आहारा संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागते. ज्यामध्ये सर्व प्रकारची फळे आणि भाज्यांचा समावेश असतो. किवी हे यापैकी एक फळ आहे, जे आकाराने लहान असले तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत.
advertisement
1/7

पावसाळ्यात मलेरिया डेंग्यू या आजारांचा धोका अधिक वाढतो. हा विषाणू एडिस एजिप्ती नावाच्या डासांद्वारे पसरतो. हे डास माणसाला चावल्यावर त्याला डेंग्यूचा संसर्ग होऊ शकतो.
advertisement
2/7
डेंग्यूचा आजार बरा करण्यासाठी, रुग्णांना आहारा संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागते. ज्यामध्ये सर्व प्रकारची फळे आणि भाज्यांचा समावेश असतो. किवी हे यापैकी एक फळ आहे, जे आकाराने लहान असले तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत.
advertisement
3/7
किवी या फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात. हे पोषक घटक डेंग्यूची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.
advertisement
4/7
किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करते. डेंग्यू तापामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. फायबरचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक समृद्ध गुण आहेत, जे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात.
advertisement
5/7
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
advertisement
6/7
किवीमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
7/7
किवीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात. यामुळे किवीमुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kiwi Benefits : डेंग्यूच्या रुग्णांसाठी वरदान आहेत ही लहान फळं, खाल्ल्यावर आजार जातील पळून