तापापासून कावीळवर रामबाण! मानवासह पशू-पक्ष्यांसाठीही वरदान ही वनस्पती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
द्रोणपुष्पी या वालुकामय जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतीत जवळपास सर्व रोग नाहीसे करण्याची शक्ती असते. शिवाय या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. द्रोणपुष्पीपासून गोळ्या, औषधांसह काढाही बनवला जातो.
advertisement
1/5

द्रोणपुष्पी ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी केवळ आजार मूळापासून नष्ट करत नाही, तर शरिराला रोगांशी लढण्यासही सक्षम करते. डॉ. सुभाषचंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वनस्पती शरिरावरील गाठींपासून कावीळ बरी करण्यास गुणकारी ठरते. शिवाय द्रोणपुष्पीमुळे तापही नष्ट होतो. म्हणूनच आयुर्वेदात या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
advertisement
2/5
द्रोणपुष्पीच्या पानांचा रस शरिरावर लावल्यास तापापासून आराम मिळतो. शिवाय या वनस्पतीच्या काढ्याने आंघोळ केल्यास किंवा अंग पुसल्यास शरिरावरून ताप नाहीसा होतो.
advertisement
3/5
द्रोणपुष्पीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ज्यांना हा काढा आवडत नसेल, त्यांनी या वनस्पतीची पानं सुकवून खावी. त्यामुळे सर्दी, खोकला, डोळ्यांचे विकार आणि डोकेदुखीवर आराम मिळतो. अगदी विंचू चावल्यावरदेखील ही पानं लाभदायी ठरतात. त्यांचा स्वयंपाकातही वापर केला जातो.
advertisement
4/5
द्रोणपुष्पीचा काढा केवळ मानवी आरोग्यासाठी नाही, तर पशू-पक्ष्यांसाठीदेखील वरदान मानला जातो. तो केवळ ताप, सर्दी, खोकल्यासाठी गुणकारी नसतो, तर त्यामुळे पोटाचे विकारही दूर होतात.
advertisement
5/5
द्रोणपुष्पीचा वापर स्वयंपाकात केला जातो. या वनस्पतीची पानं अन्नपदार्थांमध्ये वापरली जातात. त्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तापापासून कावीळवर रामबाण! मानवासह पशू-पक्ष्यांसाठीही वरदान ही वनस्पती