TRENDING:

Magic Number : मधुमेह, हृदयरोगापासून दूर राहायचंय? 'हा' मॅजिक नंबर महत्त्वाचा, तज्ज्ञांनी सांगितली सोपी पद्धत

Last Updated:
weekend catch up sleep side effects : हल्ली सगळीकडेच मधुमेह, हृदयरोगाची दहशत वाढली आहे. त्यामुळं आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. हल्ली आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की, या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यापासून वाचण्याच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
advertisement
1/11
मधुमेह-हृदयरोग दूर ठेवायचेय? हा मॅजिक नंबर महत्त्वाचा, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत
तज्ज्ञ नेहमीच या गंभीर आजारांविषयी कोणत्या ना कोणत्या मार्गे आपल्याला जागरूक करत असता. काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये. शिवाय तुमची दिनचर्या निरोगी कशी करता येईल याबद्दलही तज्ज्ञ अनेकदा बोलतात. आज असाच एक महत्त्वाचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/11
नवीन संशोधनात असं सांगितलं गेलं आहे की, 'वीकेंड कॅच-अप' मुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढू शकतो. 'वीकेंड कॅच-अप' म्हणजे आठवडाभर व्यवस्थित झोप मिळाली नसेल तो थकवा घालवण्यासाठी आणि झोप पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी जास्त झोपणे.
advertisement
3/11
तज्ज्ञांचं असं मत आहे की, जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल, तर असे 'वीकेंड कॅच-अप' न करता रोज रात्री साडेसात तास झोप घ्या. तज्ज्ञांनी एक मॅजिक नंबर सांगितला आहे. म्हणजेच 7 तास 18 मिनिटं किमान झोपण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
4/11
आपल्या शरीरासाठी झोप महत्त्वाची असते हे सर्वांना माहित आहेच. झोपेत आपले शरीर टिश्यू दुरुस्त करण्यासाठी, चयापचय नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी टायमरचा वापर करते.
advertisement
5/11
तुम्ही रोज 7 ते 9 तास झोप घेतली तर त्यामुळे तुमचे संज्ञानात्मक कार्य सुधारते, मूड स्थिर होतो, मधुमेह आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे.
advertisement
6/11
मागील संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, तुम्ही किती वेळ झोपता, याचा सरळ सरळ संबंध इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहाशी आहे. पण वीकेंड कॅच-अप,अशा झोपेच्या भूमिकेबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
advertisement
7/11
चीनमधील नानटोंग विद्यापीठाने 'बीएमजे ओपन डायबिटीज रिसर्च अँड केअर' मध्ये प्रकाशित एका अभ्यासात 20-80 वयोगटातील 10,000 हून अधिक लोकांमध्ये अंदाजे ग्लुकोज डिस्पोजल रेट मॅप (ईजीडीआर) केले आहे. त्यामधून काही गोष्टी समोर आल्या.
advertisement
8/11
ईजीडीआर कमी झाल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका जास्त असतो, मधुमेह टाळण्यासाठी 7 तास 18 मिनिटे झोप महत्त्वाची आहे. महिलांमध्ये आणि 40-59 वयोगटातील लोकांमध्ये अधिक रात्रीची झोप कमी ईजीडीआरशी संबंधित होती. काहींमध्ये आठवड्याच्या शेवटी २ तासांपेक्षा जास्त झोप कमी ईजीडीआरशी संबंधित होती.
advertisement
9/11
इंटरनॅशनल स्लिप डेपूर्वी (13 मार्च) 5,000 भारतीयांचा आढावा घेतलेल्या रेस्मेडच्या झोपेच्या सर्वेक्षणात आढळलं की, झोपेबद्दल जास्त जागरूकता आहे मात्र क्वालिटी म्हणजेच चांगली झोपेबद्दल अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. 44% भारतीयांनी झोपेला दीर्घकाळापासून सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे.
advertisement
10/11
53% लोक आठवड्यातून फक्त चार रात्री किंवा त्यापेक्षा कमी वेळेत चांगली झोप घेतात. 4 पैकी 3 भारतीय अधूनमधून काही डिव्हाईस वापरून त्यांच्या झोपेचा ट्रॅक ठेवतात, तर 39% लोकांनी रात्रीच्या खराब झोपेनंतर तणावाचा सामना केला.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Magic Number : मधुमेह, हृदयरोगापासून दूर राहायचंय? 'हा' मॅजिक नंबर महत्त्वाचा, तज्ज्ञांनी सांगितली सोपी पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल