TRENDING:

IND vs NZ Final: ना संजू ना बुमराह... रडकुंडीला आलेल्या न्यूझीलंडच्या कॅप्टनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर?

Last Updated:
New Zealand captain Mitchell Santner : फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडची टीम हताश झाल्याचं दिसून आली. त्यावेली कॅप्टन मिचेल सँटनर भावुक झाला होता.
advertisement
1/7
IND vs NZ Final : न्यूझीलंडच्या कॅप्टनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने फायनलमधील पराभवानंतर भारतीय टीमचे कौतुक केलं अन् न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी त्याने संपूर्ण प्रवासाचा उलघडा केला.
advertisement
2/7
आमच्या संघात सुरूवातीपासून काही अडचणी होत्या पण आम्ही त्यावर मात करत इथंपर्यंत पोहोचलो होतो आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आम्ही सतत यश मिळवत आलो, असंही सँटनर म्हणाला.
advertisement
3/7
पराभवानंतर न्यूझीलंडचे खेळाडू हताश झाल्याचं पहायला मिळालं. काहीचे डोळे रडकुंडीला आहे होते. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये देखील जाणं पसंत केलं नाही.
advertisement
4/7
टीम इंडिया घरच्या मैदानावर फेवरेट टीम होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या विजयाचं क्रेडिट द्यायला हवं. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रेशरमध्ये चांगला गेम दाखवला. पण आम्हाला त्याचा तोटा झाला, असं म्हणत त्याने अहमदाबादच्या प्रेक्षकांवर पराभवाचं खापर फोडलं.
advertisement
5/7
टीम इंडियाचा एका खेळाडूने मॅच जिंकवली नाही तर प्रत्येक खेळाडू संघासाठी उभा राहिला. प्रत्येक स्टेजवर वेगवेगळी आव्हानं होती, ती संघाकडून पार करण्यात आली, असंही सँटनर म्हणाला.
advertisement
6/7
आज आम्हाला संघ म्हणून कामगिरी करता आली नाही पण भारतीय संघाने हे करून दाखवलं. सुपर 8 असो वा ग्रुप स्टेज... त्यांनी चांगली कामगिरी केली. पण मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे, असंही मिचेल सँटनर म्हणाला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आम्हाला स्टेडियममध्ये क्राऊडला शांत करायचंय, असं मिचेल सँटनर याने मॅचच्या आदल्या दिवशी म्हटलं होतं. अशातच टीम इंडियाने विजय मिळून न्यूझीलंडला शांत केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final: ना संजू ना बुमराह... रडकुंडीला आलेल्या न्यूझीलंडच्या कॅप्टनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल