Dhurandhar 2 : रिलीज होण्याआधीच पाहू शकता धुरंधर 2; कुठे, कधी आणि कसा इथं पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar The Revenge : धुरंधर 2 किंवा धुरंधर द रिव्हेंज फिल्मचा ट्रेलर आणि रिलीज डेट जारी झाल्यानंतर ही फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण तुम्हाला रिलीजपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्याआधीच तुम्ही ही फिल्म पाहू शकता.
advertisement
1/7

रणवीर सिंगची बहुप्रतिक्षीत फिल्म धुरंधर 2 किंवा 'धुरंधर : द रिव्हेंज' चा ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांना संपूर्ण फिल्म कधी पाहतो असं झालं आहे.
advertisement
2/7
'धुरंधर : द रिव्हेंज' ही फिल्म 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच तुम्ही ती पाहू शकता. निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राइझ दिलं आहे.
advertisement
3/7
रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजे 18 मार्च रोजी तुम्ही धुरंधर द रिव्हेंज फिल्म पाहू शकता. निर्मात्यांनी या दिवशी चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू शो शेड्यूल केले आहेत.
advertisement
4/7
चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्याभोवती सकारात्मक चर्चा निर्माण करण्यासाठी आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी ही रणनीती अवलंबली आहे.
advertisement
5/7
देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये या पेड प्रिव्ह्यू शोसाठी विशेष तयारी केली जात आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकातासारख्या शहरांमधील अनेक थिएटरमध्ये संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंतचे स्क्रीनिंगचे वेळापत्रक निश्चित केलं आहे.
advertisement
6/7
मुंबईत पहिला शो दुपारी 4.45 वाजता सुरू होईल, तर शेवटचा शो रात्री 11.45 ला असेल. दिल्लीतही सारखीच वेळ आहे. बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अनेक स्लॉट आहेत, तर कोलकातामध्ये कमी शो आहेत.
advertisement
7/7
एडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झालं आहे. BookMyShow सारख्या प्लॅटफॉर्मवर पेड प्रीव्ह्यूसाठी तिकिट बुकिंग आधीच सुरू झाले आहे. तिकिटांच्या किमती शहर आणि थिएटरनुसार वेगवेगळ्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 : रिलीज होण्याआधीच पाहू शकता धुरंधर 2; कुठे, कधी आणि कसा इथं पाहा