TRENDING:

Mango Season: आंब्याचा बाटा चोखून फेकून देता? काय फायदा, त्यातच तर असतं सगळं

Last Updated:
'आम के आम गुठलियों के भी दाम', ही हिंदीतली प्रसिद्ध म्हण आहे. तिचा तुम्ही कधी गांभीर्याने विचार केलाय का? आंबा चवीला छान लागतोच, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत, शिवाय त्यापासून लोणच्यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात हे सगळं ठीकेय, पण त्याच्या बीचा म्हणजेच बाट्याचा काय उपयोग असतो? हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (आशिष कुमार, प्रतिनिधी / पश्चिम चम्पारण)
advertisement
1/7
Mango Season: आंब्याचा बाटा चोखून फेकून देता? काय फायदा, त्यातच तर असतं सगळं
आंब्याचा गर आणि सालीपेक्षा त्याचा बाटा प्रचंड आरोग्यदायी असतो, असं आयुर्वेद सांगतं. पित्त, कोंडा, त्वचेसंबंधित रोग, भूक न लागणं, इत्यादी अनेक समस्यांवर आंब्याचा बाटा फायदेशीर ठरतो, फक्त त्याचा नेमका वापर कसा करावा हे माहित असायला हवं.
advertisement
2/7
आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे सांगतात की, जवळपास सर्वजण आंबा खाल्ल्यावर त्याचा बाटा फेकून देतात. मात्र आपण किंवा आपल्या कुटुंबियांनी खाल्लेल्या सर्व आंब्यांचे बाटे एकत्र करून त्यांपासून औषध तयार करता येऊ शकतं.
advertisement
3/7
खाल्लेल्या सर्व आंब्यांचे बाटे एकत्र करून त्यांच्या वरचा थर सडल्यावर आतलं बीज काढून सुकवायचं. या सुकवलेल्या बीजांची पावडर बनवून दिवसातून दोनवेळा 05-05 ग्रॅम खायची.
advertisement
4/7
या पावडरमुळे पित्त, भूक न लागणं, खोकला, खोकल्यातून रक्त येणं इत्यादींसह त्वचेसंबंधित सर्व आजारांवर आराम मिळण्यास मदत होते. तसंच या पावडरमुळे शरिरातील पोषक तत्त्वांची कमतरताही भरून निघते.
advertisement
5/7
आंब्याच्या बाट्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरलसह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आरोग्यपयोगी ठरतात. या बाट्याच्या आत हलक्या पिवळसर रंगाचं सुकलेलं बीज असतं, जे अत्यंत पौष्टिक असतं आणि बाटा सडल्यावरच मिळतं.
advertisement
6/7
<a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/recipe/how-to-make-curry-syrup-at-home-see-recipe-in-marathi-mnkj-l18w-1174992.html">बाट्याच्या बीजापासून</a> तयार केलेली पावडर दररोज सकाळ-संध्याकाळी कोमट पाण्यात 5-5 ग्रॅम घेण्याचा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/what-exactly-are-the-benefits-of-kokum-sharbat-for-the-body-see-in-marathi-mpkp-l18w-1174493.html">सल्ला</a> दिला जातो. जवळपास 15 दिवस हा <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/if-the-milk-of-animals-decreases-due-to-heat-in-summer-do-these-remedies-mnkj-mhkd-1174490.html">उपाय</a> केल्यामुळे आपण पूर्णपणे सुदृढ राहू शकता.
advertisement
7/7
सूचना : लक्षात घ्या, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण हा उपाय करण्यापूर्वी स्वतः तज्ज्ञांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mango Season: आंब्याचा बाटा चोखून फेकून देता? काय फायदा, त्यातच तर असतं सगळं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल