TRENDING:

Navratri 2024: नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल

Last Updated:
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन वर्जित मानले गेले आहे. यामागे अनेक कारणे सांगितले जात असली तरीही हे खरे कारण तुम्हाला कोणीच सांगितले नसेल.
advertisement
1/7
नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल
संपूर्ण भारतात नवरात्रीची जल्लोषात सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. तसेच या नऊ दिवसांमध्ये भाविक देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात.
advertisement
2/7
दरम्यान, या दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन वर्जित मानले गेले आहे. यामागे अनेक कारणे सांगितले जात असली तरीही हे खरे कारण तुम्हाला कोणीच सांगितले नसेल.
advertisement
3/7
नवरात्रीच्या दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन वर्जित मानले जाते. या पदार्थांना आयुर्वेदात तामसिक आहाराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. शरीरात आळस, क्रोध आणि नकारात्मक भावना जागृत करणाऱ्या पदार्थांना तामसिक पदार्थ म्हटले जाते. नवरात्रीत या पदार्थांचा त्याग करणे धार्मिक आस्थेचे प्रतीक असण्याबरोबरच आरोग्यासाठीही अनेकप्रकारे फायदेशीर आहे.
advertisement
4/7
नवरात्रीत कांदा-लसूणचे सेवन टाळल्याने पचन सुधारणे, मानसिक शांती लाभणे असे अनेक लाभ होतात. आज आपण कांदा-लसूण न खाण्याचे चमत्कारी फायदे जाणून घेऊया.
advertisement
5/7
कांदा आणि लसूणचा गुणधर्म गरम असल्याने अनेकदा त्यांच्या सेवनाने पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होते. नवरात्रीत कांदा-लसूण न खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत पार पडते आणि पोटाशी संबंधीत आजारही दूर होतात.
advertisement
6/7
आयुर्वेदात सांगण्यात आले आहे की कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ असून यांच्या सेवनाने शरीरातील उग्रता, क्रोध आणि उत्तेजना वाढीस लागते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन न केल्याने मानसिक शांती मिळते. यामुळे एकाग्रता वाढण्यासही मदत होते.
advertisement
7/7
कांदा-लसूणचे सेवन टाळल्याने शरीर हलके आणि शुद्ध होते. ज्यामुळे उपवासच्या काळात शरीरात चांगली ऊर्जा तयार होते आणि शरीर तजेलदार राहते. तसेच यामुळे हार्मोनल असंतुलन टाळता येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Navratri 2024: नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल