Old Monk आणि हजारो भारतीयांना मारणाऱ्या जनरल डायरचा काय संबंध? 'हे' सत्य तुम्हाला माहितच नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर Old Monk चा जालियन वाला हत्याकांडमधील भारतीयांचा हत्यारा जनरल डायर याच्याशी संबंध आहे. आता तुम्हाला यानंतर अनेक प्रश्न पडले असतील? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/8

आजकाल सोशल मीडियावर आणि चर्चेत अनेकदा ऐकायला मिळतं की काही लोकप्रिय ब्रँड्सच्या मागे काही अनोख्या आणि ऐतिहासिक कहाण्या असतात. अशाच एका रोचक गोष्टीचा संबंध भारतातील सर्वात प्रसिद्ध रम ब्रँड ‘ओल्ड मॉन्क’शी आहे. ओल्ड मोंक हा अनेक भारतीयांचा आवडता ब्रँड आहे. पण अनेकांना या ब्रँडसंबंधीत बरीच कमी माहिती आहे.
advertisement
2/8
खरंतर Old Monk चा जालियन वाला हत्याकांडमधील भारतीयांचा हत्यारा जनरल डायर याच्याशी संबंध आहे. आता तुम्हाला यानंतर अनेक प्रश्न पडले असतील? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/8
बहुतेक लोकांना माहिती नसते, पण जनरल हॅरी डायर, ज्यांनी 1919 मध्ये जलियावालां बाग हत्याकांडाचे आदेश दिले, त्यांच्या वडिलांचे नाव एडवर्ड अब्राहम डायर होते. एडवर्ड अब्राहम डायर 1820 मध्ये इंग्लंडहून भारतात आले आणि त्यांनी भारतात पहिली ब्रुअरी उभारण्याचा प्रयत्न केला. 1855 मध्ये हिमाचल प्रदेशातील कसौलीत त्यांनी 'डायर ब्रुअरी' उभारली, जिथे भारतातील पहिली बिअर बनवली गेली.
advertisement
4/8
पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1954 मध्ये मोहन मीकिनच्या कपिल मोहन यांनी ती कंपनी विकत घेतली आणि त्याचं नाव मोहन मीकिन लिमिटेड ठेवले. ही कंपनी घेतल्यानंतर त्यांनी सर्वात आधी ‘ओल्ड मॉन्क’ डार्क रम लाँच केली. ही रम लवकरच भारतात आणि जगभरात प्रसिद्ध झाली.
advertisement
5/8
ओल्ड मॉन्क हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे रम ब्रँड बनले. मोहन कुटुंबाला भारतातील पहिले औद्योगिक मद्य व्यवसायी मानलं जातं.
advertisement
6/8
कपिल मोहन भारतीय सेनेत ब्रिगेडियर म्हणून रिटायर झाले आणि त्यानंतर मोहन मीकिन लिमिटेडचे नेतृत्व त्यांनी घेतले. डार्क रम बनवण्याचे श्रेय कपिल मोहन यांना दिले जाते. 2010 मध्ये त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.
advertisement
7/8
2015 मध्ये सोशल मीडियावर अफवा पसरली होती की ओल्ड मॉन्क बंद होणार आहे, परंतु कपिल मोहन यांनी स्वतः जाऊन स्पष्ट केलं की असे काही होणार नाही. दक्षिण भारतात विक्री कमी झाली असली तरी ब्रँड कायम ठेवण्याचे त्यांनी ठरवले.
advertisement
8/8
आज ओल्ड मॉन्क रम 50 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाते आणि त्यामागील कहाणी, ज्यामध्ये ऐतिहासिक आणि आधुनिक काळाचे मिश्रण आहे, अनेकांना आश्चर्यचकित करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Old Monk आणि हजारो भारतीयांना मारणाऱ्या जनरल डायरचा काय संबंध? 'हे' सत्य तुम्हाला माहितच नसेल