TRENDING:

Oral Health : सकाळी ब्रश करण्यापूर्वी की नंतर कधी पाणी प्यावे? चांगल्या आरोग्यासाठी काय आहे योग्य पद्धत?

Last Updated:
Morning water drinking benefits :
advertisement
1/10
ब्रश करण्यापूर्वी की नंतर कधी पाणी प्यावे? आरोग्यासाठी काय आहे योग्य पद्धत
सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे डॉक्टर देखील सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला देताता. पण काही जणांना असा प्रश्न पडला आहे की अशावेळी ब्रश करुन पाणी प्यावं की ब्रश शिवाय पाणी प्यावं? कोणती पद्धत योग्य आहे?
advertisement
2/10
काही जण असं म्हणतात की रिकाम्या पोटी आणि ब्रश केल्या शिवाय पाणी प्यावं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण अनेकांचं असं म्हणनं आहे की ब्रश न करता पाणी प्यायलो तर तोंडातील जंत पोटात जातील ज्यामुळे ते शरिरासाठी हानिकारक ठरेल. अशावेळी लोक संभ्रमात पडतात की काय करायचं? चला यासंदर्भात थोडं जाणून घेऊ. (World Oral Health)
advertisement
3/10
झोपेत असताना शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी पिणे पचनक्रियेस मदत करते आणि टॉक्सिन्स बाहेर टाकते.
advertisement
4/10
ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने काय फायदे होतात?पचनक्रिया सुधारतेशरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातातत्वचा चमकदार होतेबद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
advertisement
5/10
ब्रश केल्यानंतर पाणी प्यायल्याने काय होते?ब्रश केल्यावर तोंडातील नैसर्गिक लाळ नष्ट होते. ही लाळ पचनासाठी उपयुक्त असते. त्यामुळे ब्रशपूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते.
advertisement
6/10
ब्रश करण्याआधी किती पाणी प्यावे?1-2 ग्लास कोमट पाणी प्यायल्यास शरीराला अधिक फायदे होतात. काहीजण कोमट लिंबूपाणी किंवा हर्बल टी देखील घेतात.
advertisement
7/10
कोणत्या वेळी पाणी पिऊ नये?जेवणाच्या लगेच आधी किंवा नंतर पाणी पिऊ नये, कारण यामुळे पचनावर परिणाम होतो.
advertisement
8/10
सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?उठल्यावर आधी पाणी प्या15-20 मिनिटांनी ब्रश कराब्रश केल्यानंतर पाणी प्यायचे असल्यास थोड्या वेळाने घ्या
advertisement
9/10
पण एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी ब्रश न करता पाणी पिण्यासाठी रात्री ब्रश करुन झोपणं गरजेचं आहे. तुमची ओरल हेल्थ चांगली असेल तर जंतू तोंडात रहाणार नाहीत आणि हेल्दी बॅक्टेरीया तयार होतील. ज्याचा शरीराला फायदाच मिळेल.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Oral Health : सकाळी ब्रश करण्यापूर्वी की नंतर कधी पाणी प्यावे? चांगल्या आरोग्यासाठी काय आहे योग्य पद्धत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल