Benefits of pomegranate: लालचुटूक डाळिंब फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Pomegranate Health Benefits: हिवाळ्यात येणाऱ्या अनेक पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर फळांपैकी एक फळ म्हणजे डाळिंब. लाल चुटूक टपोऱ्या डाळिंबाचे दाणे दिसायला जितके सुंदर, तितके ते चवीला अप्रतिम. मात्र डाळिंबात असलेल्या अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांमुळे डाळिंब खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. डाळिंबाची साल, पानं आणि बियांचा देखील औषधांसाठी वापर केला जातो, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. जाणून घेऊयात डाळिंब खाण्याचे फायदे.
advertisement
1/7

डाळिंबात पॉलिफेनॉल सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी डाळिंब खाणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र ज्यांची शुगर जास्त आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डाळिंब खावं.
advertisement
2/7
डाळिंबात एलागिटॅनिन अँटिऑक्सिडेंट असतं जे मेंदूसाठी फायद्याचं असतं. यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन मेंदूच्या पेशींना फायदा होऊन त्यांची वाढ होते. डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन रोगांना दूर ठेवता येतं.
advertisement
3/7
डाळिंबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून घातक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. अतिरिक्त साखर न घातला डाळिंबाचा ज्यूस प्यायलात तर तोही तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो
advertisement
4/7
डाळिंबात इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट असतात, जी शरीराची झीज भरून काढायला मदत करतात. त्यामुळे ज्यामुळे आजारी व्यक्तींनी जर रोज एक डाळिंब खाल्लं तर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते.
advertisement
5/7
डाळिंबात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होतं आणि हिवाळ्यात आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
advertisement
6/7
डाळिंबात असलेल्या लोहामुळे शरीरातील रक्त वाढायला आणि रक्त शुद्ध व्हायला मदत होते. ज्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा आजार आहे त्यांना डाळिंब खाल्ल्याचा फायदा होऊ शकतो. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
advertisement
7/7
डाळिंबात फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे पचनशक्ती वाढवण्यास मदत होते. अपचन, बद्धकोष्ठता किंवा गॅसेसच्या समस्या असणाऱ्यांना डाळिंब खाणे फायद्याचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of pomegranate: लालचुटूक डाळिंब फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर