TRENDING:

Real vs Fake Almond : तुम्ही नकली बदाम तर खात नाही ना? अशी करा खऱ्या-खोट्याची ओळख, नाहीतर आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

Last Updated:
हल्ली बदाममध्ये देखील भेसळ होत आहे. ज्यामुळे आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारा बदाम सुद्धा आता. शरीरासाठी हनिकारक ठरत आहे.
advertisement
1/8
Real vs Fake Almond: तुम्ही नकली बदाम तर खात नाही ना? अशी करा खऱ्या-खोट्याची ओळख
आजकाल बाजारात अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळते. भाजीपाला, फळे, मांस आणि ड्रायफ्रूट्समध्येही रसायनं मिसळली जातात, त्यामुळे हे पदार्थ शरीरासाठी घातक ठरू शकतात.
advertisement
2/8
बदाम हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. तो स्मरणशक्ती वाढवतो, तसेच मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून संरक्षण देतो. अनेक पालक आपल्या मुलांना दररोज बदाम खायला देतात.
advertisement
3/8
पण तुम्ही खात असलेला बदाम खरं आहे का? हल्ली बदाममध्ये देखील भेसळ होत आहे. ज्यामुळे आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारा बदाम सुद्धा आता. शरीरासाठी हनिकारक ठरत आहे.
advertisement
4/8
बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बदाम विकले जात आहेत, ज्यात अतिरेकी प्रमाणात रसायने मिसळलेली असतात. हे रसायनयुक्त बदाम शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही योग्य बदाम ओळखणे गरजेचे आहे.
advertisement
5/8
खरे आणि नकली बदाम कसे ओळखाल? 1. प्रकार आणि रंग: चांगल्या दर्जाच्या बदामांचा रंग एकसंध आणि हलका तपकिरी असतो. जर बदामांवर काळे डाग किंवा अनियमित आकार दिसत असतील, तर ते निकृष्ट दर्जाचे असू शकतात.
advertisement
6/8
2. पाण्याची चाचणी: एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात बदाम टाका. जर बदाम बुडाले तर ते चांगल्या प्रतीचे आहेत, पण जर ते पाण्यावर तरंगत राहिले, तर ते खराब किंवा बनावट असू शकतात.
advertisement
7/8
3. चव आणि वास: अस्सल बदाम गोडसर चवीचे असतात. कडसर किंवा विचित्र वास असलेले बदाम खराब असू शकतात. जर बदाम खूप तेलकट वाटत असतील, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.
advertisement
8/8
बाजारातून बदाम खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा!जर तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यासाठी लाभदायक बदाम खायचे असतील, तर नेहमी सुप्रसिद्ध ब्रँड्समधून किंवा विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच बदाम खरेदी करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Real vs Fake Almond : तुम्ही नकली बदाम तर खात नाही ना? अशी करा खऱ्या-खोट्याची ओळख, नाहीतर आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल