TRENDING:

डोसा म्हटलं की 'वाह'! आजच घरच्या घरी बनवा झक्कास म्हैसूर मसाला डोसा, जाणून घ्या रेसिपी

Last Updated:
म्हैसूर मसाला डोसा हा डोश्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे. यासाठी भात, डाळ, मेथी वापरून पीठ तयार केलं जातं आणि आलू-मसाला व झणझणीत मसाला भरण्यात येतो. चीज घालून हा डोसा अधिक स्वादिष्ट बनतो. घरच्या घरी ही रेसिपी सहज करता येते. चला तर सविस्तर जाणून घेऊ रेसिपी...
advertisement
1/8
डोसा म्हटलं की 'वाह'! आजच घरच्या घरी बनवा झक्कास म्हैसूर मसाला डोसा...
डोसा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, नाही का? काही लोक तर डोस्याचे इतके दिवाने असतात की विचारू नका! अशा डोसाप्रेमींसाठी कितीतरी प्रकारचे डोसे आहेत - मसाला डोसा, तूप डोसा, कांदा डोसा, रवा डोसा आणि त्यातलाच एक खास म्हणजे चविष्ट म्हैसूर मसाला डोसा! चला तर मग, याची सोपी रेसिपी बघूया!
advertisement
2/8
डोसा बॅटरसाठी साहित्य : 1 कप तांदूळ, ¼ कप उडीद डाळ, 1 चमचा शेंगदाणे, चिमूटभर मेथीचे दाणे, चवीनुसार मीठ.
advertisement
3/8
मसाला तयार करण्यासाठी साहित्य : 1 मोठा आणि बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप उकडलेले बटाटे, अर्धा चमचा हळद पावडर, छोटा तुकडा बारीक चिरलेले आले, गरजेनुसार कढीपत्ता, चवीनुसार मीठ.
advertisement
4/8
कृती : पहिलांदा तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात साधारण 3 तास भिजवून घ्या. त्यात मेथीचे दाणे पण भिजत घाला. मग मिक्सर किंवा ग्राइंडरमध्ये छान बारीक वाटून घ्या आणि त्याला आंबवण्यासाठी बाजूला ठेवा. डोस्याचं पीठ तयार!
advertisement
5/8
आता बटाट्याचा मसाला बनवूया : एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाका. थोडा कांदा, हिरवी मिरची, आलं आणि हळद टाकून परतून घ्या. थोड्या वेळाने बटाटे टाका आणि चांगले फ्राय करा. चवीनुसार मीठ टाका आणि 5 मिनिटे शिजवा. बटाट्याचा मसाला रेडी!
advertisement
6/8
आता बनवूया खास म्हैसूर मसाला : यासाठी एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यात कांदा, हिरवी मिरची, भाज्या (तुम्हाला आवडतील त्या) आणि पावभाजी मसाला टाकून चांगलं परतून घ्या. बटर वेगळं होईपर्यंत शिजवा. मसाला तयार! आता दोन्ही मसाले एकत्र मिक्स करा.
advertisement
7/8
मग डोस्याचा तवा गरम करा आणि नेहमीच्या डोस्यासारखं पीठ पसरवा. तो शिजल्यावर त्यावर तयार केलेला मसाला ठेवा. गरमागरम आणि चविष्ट म्हैसूर मसाला डोसा तयार!
advertisement
8/8
हा लेख तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या चविष्ट म्हैसूर मसाला डोस्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची रेसिपी सांगतो आहे..!! ट्राय करायला विसरू नका!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
डोसा म्हटलं की 'वाह'! आजच घरच्या घरी बनवा झक्कास म्हैसूर मसाला डोसा, जाणून घ्या रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल