Chicken Recipe: चिकनमध्ये केशर दूध घातलंय कधी? नवाबांची शाही डिश, नुसत्या सुगंधानेच लागेल भूक!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Zafrani Chicken Recipe: मांसाहारीप्रेमींसाठी चिकन, मटणाचा बेत म्हणजे अगदी 2 घास जास्त जाण्याचा दिवस असतो. काहीजणांना चिकन सूप आवडतं, काहीजणांना रस्सा आवडतो, तर काहीजणांना सुक्कं चिकन-मटण आवडतं. काहीजण मात्र चिकनचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करतात. अशीच एक खास नवाबी चिकन डिश रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
advertisement
1/5

भारतातल्या प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे 'जाफरानी चिकन'. केशर (जाफरान) आणि हातानं वाटलेल्या मसाल्यांनी हे स्वादिष्ट चिकन बनवलं जातं.
advertisement
2/5
अनेक भागांमध्ये जाफरानी चिकन हा पदार्थ शाही जेवणात वाढतात. दूध आणि केशरापासून हे चिकन बनवतात.
advertisement
3/5
जाफरानी चिकन बनवण्यासाठी एका मोठ्या वाटीत दही, आलं-लसणाची पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि लाल मिरची पावडर घ्यावी. हे मिश्रण एकजीव करून फ्रेश चिकनचे तुकडे त्यात किमान तासभर मॅरिनेट करावे.
advertisement
4/5
आता एका वाटीत कोमट दूध घेऊन त्यात केशर घालावं. हे मिश्रण 10-15 मिनिटं तसंच राहू द्यावं. मग एका कढईत तेल किंवा तूप तापवून त्यात जिरं घालावं. जिरं चांगलं तडतडलं की, त्यात कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत फ्राय करावा. मग त्यात हिरवी मिरची आणि काजू-बदामाची पेस्ट घालून 2-3 मिनिटं मिश्रण ढवळून व्यवस्थित शिजू घ्यावं.
advertisement
5/5
आता मॅरिेनेट केलेलं चिकनही कढईत घालून बारीक गॅसवर 10-12 मिनिटं शिजवावं. चिकन अर्ध शिजल्यानंतर त्यात आपण बनवलेल्या केशर दुधासह मलई आणि थोडं दूध घालून व्यवस्थित एकजीव करावं. पूर्ण शिजवावं, जेणेकरून चिकनला छान फ्लेव्हर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chicken Recipe: चिकनमध्ये केशर दूध घातलंय कधी? नवाबांची शाही डिश, नुसत्या सुगंधानेच लागेल भूक!