TRENDING:

ओल्या हरभऱ्यापासून घरीच बनवा स्वादिष्ट कचोरी; 'ही' सोपी रेसिपी पाहाच

Last Updated:
अनेकांनी हरभऱ्याचा डहाळा भाजून खाल्ला असेल पण त्यापासून स्वादिष्ट कचोरीची रेसिपी बनवता येते.
advertisement
1/6
ओल्या हरभऱ्यापासून घरीच बनवा स्वादिष्ट कचोरी; 'ही' सोपी रेसिपी पाहाच
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून या ऋतूमध्ये बाजारात ओला हिरवा हरभरा उपलब्ध होतो. अनेकजण हा डहाळा भाजून खातात. पण याच ओल्या हरभऱ्यापासून स्वादिष्ट कचोरी आपल्याला बनवता येऊ शकते. अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने हरभऱ्याची ही कचोरी कशी बनवावी? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील मीना शिंदे यांनी माहिती दिलीय.
advertisement
2/6
कचोरीसाठी साहित्य : कचोरीसाठी हिरवा हरभरा 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोथिंबीर, भिजवलेली मुगडाळ हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
3/6
गरजनेनुसार हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, हिंग, ओवा, तेल लागते. तसेच कढीपत्ता, लिंबू, साखर, 2-3हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, 1 मोठी वाटी मैदा या साहित्यातून रूचकर अशी कचोरी बनवता येते.
advertisement
4/6
कचोरी बनवण्याची कृती : सर्वप्रथम हिरवा हरभरा, चार-पाच लसून कळ्या, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यायच्या. त्यानंतर कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि हिंग घालून कांदा आणि भिजवलेली मुगडाळ लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर त्यात मिक्सरमधून बारीक केलेलं जाडसर मिश्रण घालून परतून घ्यायचं. चवीसाठी त्यावर लिंबू आणि थोडी साखर ऍड करायची आहे.
advertisement
5/6
परतून झाल्यानंतर अंदाजे दोन ते चार मिनिटानंतर गॅस बंद करून ओवा घालून मैदा भिजवून घ्यायचा आहे. मैदा साध्या पाण्याने घट्ट भिजवायचा आहे. आता हातात छोटीशी पारी करून घ्यायची हाताने किंवा लाटूनही तयार करता येऊ शकते. आता मैद्याच्या या छोट्याशा पारीमध्ये मिश्रण घालून पूर्ण बंद करून कचोरीचा आकार द्यायचा आहे. आता मध्यम आचेवर गरम तेलामध्ये या कचोरी तळून घ्यायच्या आहेत. आता हिरव्या हरभऱ्यापासून बनलेली कचोरी तयार आहे. दही, खारी बुंदी, शेव, कोथिंबीरने सर्व्ह करताना सजावट करू शकता.
advertisement
6/6
कचोरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. या कचोरीची चव आपल्याला हरभऱ्याच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. आणि तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत तुम्ही या कचोरीचा आस्वाद घेऊ शकता. तर ओल्या हरभऱ्यापासून अगदी कमी वेळेत तयार होणारी चविष्ट अशी ही कचोरी तुम्ही देखील नक्की ट्राय करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
ओल्या हरभऱ्यापासून घरीच बनवा स्वादिष्ट कचोरी; 'ही' सोपी रेसिपी पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल