गव्हाचा पिठापासून बनवा विदर्भ स्टाईल पापडा, वर्षभर राहील टिकून, एकदम सोपी रेसिपी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उन्हाळ्यात वर्षभर टिकणारे पदार्थ बनवून ठेवले जातात. विदर्भात असाच नाश्त्यासाठी गव्हाच्या पिठापासून पापडा बनवला जातो. याची रेसिपी पाहू.
advertisement
1/7

विदर्भात उन्हाळ्यामध्ये महिला अनेक प्रकारचे पदार्थ बनवून ठेवतात. वर्षभर नाश्त्यासाठी लागणारे शेवया, पापड, कुरडया आणि बरच काही घरोघरी बनवलं जातं आणि ते वर्षभर साठवून ठेवलं जातं. गव्हापासून अनेक पदार्थ बनवता येतात.
advertisement
2/7
त्यातीलच एक म्हणजे पापडा. हा पापडा गव्हाच्या बारीक पिठापासून बनवला जातो. वर्षभर साठवून ठेवला की, सकाळच्या नाश्त्याला पापडा बनवता येतो. ही रेसिपी अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
पापडा बनवण्यासाठी पीठ कसे तयार करायचे? सर्वात आधी 2 किलो गहू पाण्यात दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर ते एका पाणी झरेल अशा टोपल्यात काढून ठेवायचे. दिवसभर त्यातील पाणी झरू द्यायचे. गव्हाचे संपूर्ण पाणी झरले की तेच गहू आपल्याला रात्रभर एका कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहेत. त्यानंतर सकाळी गिरणीमधून त्याचे पीठ दळून आणायचे आहे.
advertisement
4/7
पीठ दळून आणल्यावर सर्वात आधी ते रेगुलर चाळणीने चाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एकदम बारीक असणारी चाळणी घ्यायची. पीठ दोन ते तीन वेळा चाळल्यानंतर मैद्यासारखे पांढरे शुभ्र असे तयार होईल. त्याचबरोबर त्यात काही प्रमाणात रवा सुद्धा निघेल तो रवाही आपल्याला पापडासाठी वापरायचा आहे.
advertisement
5/7
पापडा बनवण्यासाठी पीठ तयार झाले की त्यात रवा मिक्स करून घ्यायचा आहे. जेव्हा पापडा करायचा असेल तेव्हा ते पीठ भिजवून घ्यायचे. पीठ भिजवताना त्यात थोडे मीठ घालून भिजवायचे आहे. भिजवल्यानंतर तीन ते चार तास ते पीठ छान सेट होईपर्यंत ठेवायचे आहे. तीन तासानंतर पीठ सेट झालेले असेल. आता भिजवलेले पीठ व्यवस्थित लांबवून घ्यायचं आहे. जेवढं जास्त पीठ लांबवलं जाईल तेवढा पापडा व्यवस्थित तयार होईल. पीठ लांबवून झाले की, पापडा लाटून घ्यायचा आहे.
advertisement
6/7
पापडा लाटताना पोळीसारखाच लाटून घ्यायचा आहे. मोठी पोळी तयार झाली की ती हातावर घ्यायची. त्यानंतर थोडी लांबवून घ्यायची आहे. त्यानंतर टोपली किंवा पारडं घ्यायचं आणि त्यावर ती पोळी टाकायची. त्यावर सुद्धा पातळ होईपर्यंत लांबवून घ्यायची आहे. त्याला काही काठ राहल्यास ते काढून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे पापडा तयार होईल. त्यानंतर टोपली उन्हात वाळत ठेवायची आहे. उन्हात काही वेळ वाळल्यानंतर या टोपलीवरील पापडा काढून चादरीवर टाकून घ्यायचा आहे.
advertisement
7/7
पापडा दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचा आहे. वाळवून घेतल्यानंतर पापडा बारीक करून डब्यात भरता येईल. अशा प्रकारे तुम्ही वर्षभर साठवून ठेवण्यासाठी पापडा बनवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
गव्हाचा पिठापासून बनवा विदर्भ स्टाईल पापडा, वर्षभर राहील टिकून, एकदम सोपी रेसिपी