Famous Food : नाश्त्यासाठी घरीच बनवा ‘हा’ फेमस गुजराती पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गुजरातची वेगळी अशी खाद्य संस्कृती आहे. त्यामुळे खवय्ये येथील विविध लोकप्रिय पदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात.
advertisement
1/6

गुजरात हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच गुजरातची वेगळी अशी खाद्य संस्कृती आहे. त्यामुळे खवय्ये येथील विविध लोकप्रिय पदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात.
advertisement
2/6
गुजराती पदार्थ घरी बनवायला ही तितकेच सोपे आहेत. गुजराती ऑथेंटिक हांडवा डिश कशी तयार केली जाते? याबाबत आपण अहमदाबादमधील सोनलबेन रामजीभाई पटेल यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
3/6
अहमदाबादमध्ये सोनलबेन यांचा नाश्ता पदार्थ विकण्याचा व्यवसाय आहे. फूड स्टॉलवर ऑथेंटिक गुजराती पदार्थ हांडवा व खेचू त्या विकतात. हांडवा व खेचू हा नाश्ता प्रकार असून गुजरातमध्ये लोक त्यांच्या दैनंदिन आहारात या पदार्थांचा समावेश करतात. हांडवा तयार करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. तुम्ही घरी देखील ती तयार करू शकता.
advertisement
4/6
तांदूळ, डाळी, मेथी दाणे हे 5 ते 6 तास भिजवून, धुवून वाटून घ्यावे. त्यात दही टाकून किमान 8 ते 10 तास मिश्रण फरमेंट करावे. त्यानंतर त्यात दुधी, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घ्यावं. 1 चमचा तेल गरम करून मोहरी,जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग, दीड चमचा तीळ, ति़खट टाकून फोडणी करावी व ती तयार मिश्रणात घालावी. चिमूटभर सोडा टाकून ते हलवावं. हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार आहे, असे सोनलबेन सांगतात.
advertisement
5/6
नॉनस्टिक कढई मधे 1 चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत. त्यावर लगेच मिश्रण ओतावे. कढई छोट्या गॅसवर एकदम कमी फ्लेमवर ठेवावी. हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी.
advertisement
6/6
नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत भाजून घ्यावी. अशाप्रकारे हांडवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे, असे सोनलबेन सांगतात. त्यामुळे ही गुजराती हांडवा सोपी रेसिपी आपणही घरी ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Famous Food : नाश्त्यासाठी घरीच बनवा ‘हा’ फेमस गुजराती पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल