आता तृणधान्यांपासून बनवा पौष्टिक अळूवडी, पाहा झटपट रेसिपी
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
आपण बेसनची अळूवडी नक्कीच ट्राय केली असेल. पण तृणधान्यांपासून बनवलेली अळूची वडी कधी खाल्लीय का? पाहा रेसिपी
advertisement
1/9

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत अळूची वडी हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. प्रत्येक भागात ही वडी बनवण्याची वेगळी रेसिपी असते.
advertisement
2/9
आपण बेसनपासून बनवलेली अळूवडी नक्कीच खाल्ली असेल. पण पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेली अळूची वडी कधी ट्राय केलीय का? वर्धा येथील गृहिणी रमा सोनगडे यांनी याच अळूच्या वडीची रेसिपी आपल्याला सांगितली आहे.
advertisement
3/9
अळूची वडी बनवण्यासाठी अगदी घरातीलच साहित्य आवश्यक असते. अळूची धुवून स्वच्छ केलेले पाने, तांदळाचे पीठ, भिजवलेले चणे, भिजवलेले मटकी आणि मूग, धनेपूड, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर या साहित्यात अळूवडी तयार होते.
advertisement
4/9
सर्वप्रथम मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवलेले चणे, भिजवलेले मूग आणि भिजवलेली मटकी बारीक करून घ्यायची आहे. या पेस्टमध्ये धने पूड, जिरे पूड, तिखट, हळद, मीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करून स्वच्छ धुऊन घेतलेल्या धोप्याच्या म्हणजेच अळूच्या पानांवर ही पेस्ट लावून घ्यायचे आहे.
advertisement
5/9
एकावर एक तीन असे तीन-चार पान ठेवून पाने फोल्ड करून घ्यायचे आहे. रोल झाल्यानंतर एका कढई किंवा गंजामध्ये 1-2 ग्लास पाणी घालून पाणी उकळायला ठेवावे. त्यानंतर त्या गंजावर किंवा कढईवर एक स्टीलची चाळणी ठेवावी.
advertisement
6/9
हा फोल्ड केलेला अळूचा रोल त्यावर ठेवावा. दहा ते पंधरा मिनिटे रोल वाफवून झाल्यानंतर रोल बाहेर काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत.
advertisement
7/9
तव्यावर थोडं तेल घालून शॅलो फ्राय करून घ्यायचे. अनेक जणांना तेलात डीप फ्राय केलेले पदार्थ आवडत नाहीत किंवा ते खाणे टाळतात. अशांसाठी कमी तेलात शॅलो फ्राय केलेली ही अळूवडी अतिशय रुचकर, टेस्टी लागते. त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
advertisement
8/9
अनेकदा अळूची म्हणजेच धोप्याची पानं गळ्याला खाजतात म्हणून अनेक जण खात नाहीत. मात्र अळूची वडी किंवा अळूची भाजी बनवत असताना त्यात थोडे दही किंवा चिंचेचे पाणी घालावे. असे केल्याने धोपा खाल्ल्यावर गळ्याला सुटणारी खाज होत नाही.
advertisement
9/9
या व्हिडिओमध्ये वापरलेली पाने खाजत नाहीत. त्यामुळे त्यात दही किंवा चिंचेच्या पाण्याचा वापर केलेला नाही, असे रमा सोनगडे सांगतात.