Lemon Tea Recipe : रोजचा चहा विसराल, जर अशी मसालेदार लेमन टी प्याल, घरी बनवू शकता!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
भारतात चहा जवळपास प्रत्येक घरात बनवला जातो. बहुतांशी लोकांना कोरा किंवा दुधाचा चहा आवडतो, तर फिटनेस फ्रिक लोक ग्रीन टी पितात. काही लोकांना लेमन टी म्हणजेच लिंबाचा चहासुद्धा आवडतो, परंतु हा चहा सर्वांनाच बनवता येतो असं नाही. त्यामुळे आज आपण परफेक्ट लेमन टी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे हा साधासुधा लिंबाचा चहा नाही, तर मसालेदार चहा असणार आहे.
advertisement
1/5

लेमन टीचे आरोग्याला विशेष फायदे होतात, असं म्हणतात. शिवाय या चहाची रेसिपीही सोपी असते. लेमन टीसाठी लागतं पाणी, काळं मीठ, साखर, गरम मसाला, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस आणि चहापावडर.
advertisement
2/5
सर्वात आधी चहाचं भांड गॅसवर ठेवून पाणी उकळून घ्यावं. पाणी गरम होताच त्यात साखर, काळं मीठ, गरम मसाला आणि काळीमिरी पावडर घालावी.
advertisement
3/5
साखर, मीठ पाण्यात व्यवस्थित मिसळले की त्यात चहापावडर घालावी. मग 3 ते 4 मिनिटं छान उकळी येऊ द्यावी.
advertisement
4/5
चहापावडर व्यवस्थित शिजल्यानंतर पातेलं गॅसवरून खाली उतरून घ्यावं. त्यात आवडीनुसार लिंबू पिळावा. लक्षात घ्या, गॅस बंद करूनच चहात लिंबू पिळावं, नाहीतर चहा कडवट होऊ शकतो.
advertisement
5/5
शेवटी कपमध्ये लिंबाचा चहा गाळून ओतावा. हा चहा छान चटपटीत लागतो. विशेष म्हणजे हा चहा जेवढा स्वादिष्ट असतो तेवढेच त्याचे आरोग्यदायी फायदे असतात, असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Lemon Tea Recipe : रोजचा चहा विसराल, जर अशी मसालेदार लेमन टी प्याल, घरी बनवू शकता!