Corn : भाजलेला की उकडलेला, आरोग्यासाठी कोणता मका चांगला?
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही मका कसा खाता यावर त्याचे फायदे अवलंबून आहेत. मका उकडून आणि भाजून खाण्याने आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात. उकडलेला मका खाल्ल्याने काय होतं?
advertisement
1/5

पावसाळा आणि गरमागरम मका म्हणजे एकप्रकारे समीकरणच म्हणावं लागले. पावसाळ्यात गरमागरम मका खाण्याची मजा काही औरच. काहींना मका उकडून खायला आवडतो तर काहींना भाजून. पण दोन्हीपैकी आरोग्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
उकडलेले कॉर्न खाल्ल्याने हे त्यातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी सारखेपाण्यात विरघळणारे पोषक तत्व कमी होऊ लागतात. उकडलेले कॉर्न पचायला जड असतात, ते पचायला वेळ लागतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी मका उकडून खाणं फायद्याचं आहे.
advertisement
3/5
मका भाजल्यावर पाण्यात आणि उष्णतेमध्ये विरघळणारे पोषक घटक कमी होत नाहीत. पण जेव्हा मका भाजला जातो तेव्हा तो थेट उष्णता आणि धुराच्या संपर्कात येतो. यामुळे मक्यात कर्करोगजन्य संयुगे तयार होतात, जे आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे शरीरात अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. पण भाजलेला मका खाणं पचनसंस्थेसाठी आणि हृदयासाठी अधिक फायदेशीर आहे.
advertisement
4/5
तज्ज्ञांच्या मते, उकडलेले आणि भाजलेले दोन्ही प्रकारचे कॉर्न फायदेशीर आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि चवीनुसार सेवन करण्याची पद्धत निवडली पाहिजे. पण मका उकडून किंवा भाजून खाण्यापेक्षा फक्त वाफवून घेणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे त्यातील पोषक घटक कमी होत नाहीत. ते पचायला सोपे जातात आणि वजन कमी करण्यासदेखील मदत करतात.
advertisement
5/5
सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. तुम्हाला सामान्य माहिती दिली आहे. या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी तज्ञांशी बोला.