TRENDING:

Termites : घराच्या कोपऱ्यात ही गोष्ट दिसली तर सावध व्हा, हा उपाय करा, नाहीतर वाळवी तुमचं अख्खं घर खाईल

Last Updated:
जर फर्निचरची योग्य देखभाल केली नाही, तर वाळवी त्यावर हल्ला करतात आणि काही दिवसांत ते फर्निचर बेकार किंवा खराब होतं.
advertisement
1/9
कोपऱ्यात ही गोष्ट दिसली, तर हा उपाय करा, नाहीतर वाळवी तुमचं अख्खं घर खाईल
उन्हाळा सुरू झाला की घरातील लाकडी फर्निचरची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण याच काळात वाळवीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. ज्यानंतर हे किटक फर्निचर पोखरायला लागतात. जर फर्निचरची योग्य देखभाल केली नाही, तर वाळवी त्यावर हल्ला करतात आणि काही दिवसांत ते फर्निचर बेकार होतं.
advertisement
2/9
विशेषतः गरम आणि दमट हवामान वाळवीच्या वाढीस पोषक ठरतं.
advertisement
3/9
वाळवीचा धोका कसा ओळखाल? वाळवी फर्निचरच्या आतील भागावर हल्ला करतात. त्यामुळे लाकडाचं बाह्य आवरण तसेच पेंट सुरळीत दिसतं, पण आतून ते पूर्णपणे पोखरलेलं असतं. म्हणूनच समस्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
advertisement
4/9
घराच्या भिंतींवर मातीच्या बारीक नळ्यांसारख्या रेषा दिसल्या, खिडक्या-दारांच्या भागात उडणाऱ्या किटकांचे पंख मोठ्या संख्येने दिसले, लाकडी वस्तू ठोठावल्यावर पोकळ आवाज येत असेल, तर ही वाळवीची सुरुवात समजा.
advertisement
5/9
यावर उपाय काय करावा? लाकडावर थाप द्या: लाकडाला हलकं ठोठावून त्यात पोकळ आवाज येतोय का हे तपासा.
advertisement
6/9
पंख दिसले तर सावध व्हा: वाळवी जोडीदार मिळाल्यावर पंख गाळतात, त्यामुळे पंख दिसणं म्हणजे त्यांच्या वाढीचा इशारा आहे.
advertisement
7/9
कीटकनाशक फवारणी: एकदा दीमकाची खात्री पटली की त्वरित कीटकनाशक फवारणी करा. विशेषतः घराभोवतीच्या मातीवर फवारणी करणं महत्त्वाचं आहे. प्राकृतिक उपाय: संतऱ्याचं तेल: यातलं डी-लिमोनीन घटक वाळवीसाठी विषारी असतं व्हिनेगर: पाण्यात मिसळून फर्निचरवर फवारणी केल्यास उपयोग होतो.
advertisement
8/9
बोरेक्स पावडर: एका चमचा बोरेक्स पावडरला 250 मि.ली. गरम पाण्यात मिसळून स्प्रे करा. फर्निचरला उन्हात ठेवा: 3 दिवस तीव्र उन्हात ठेवल्यास वाळवी मरतात.
advertisement
9/9
वाळवी पसरण्याआधीच उपाययोजना करणं अधिक योग्य. लाकूड ओलसर होणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी कोरड्या कपड्याने फर्निचर पुसा. याशिवाय, वाळवीप्रतिरोधक पॉलिश वापरणं देखील फायदेशीर ठरतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Termites : घराच्या कोपऱ्यात ही गोष्ट दिसली तर सावध व्हा, हा उपाय करा, नाहीतर वाळवी तुमचं अख्खं घर खाईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल