Beauty Tips : ब्लॅक ड्रेसवर शोभून दिसतात 'या' 5 रंगाच्या लिपस्टिक! वेगवेगळ्या प्रसंगासाठी निवडा परफेक्ट शेड
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Choose Perfect Lipstick : मेकअपचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो लिपस्टिक. योग्य लिपस्टिक लावली गेली तर चेहरा अगदी खुलून दिसतो. पण त्याचा लिपस्टिकचा शेड चुकला तर आपला लूक खराब होऊ शकतो. ब्लॅक ड्रेसवर सुंदर दिसतील अशा काही लिपस्टिक शेड्स इथे आहेत.
advertisement
1/7

लिपस्टिकची निवड आपण कोणत्या रंगाचा ड्रेस घालणार आहोत त्यावरून करावी लागते आणि आपण कुठल्या प्रसंगी तो ड्रेस घालणार आहोत. यावरूनही लिपस्टिकची योग्य शेड निवडावी लागते.
advertisement
2/7
काळ्या रंगाच्या ड्रेससोबत कोणत्या प्रसंगी कोणत्या रंगाची लिपस्टिक वापरावी हे इथे दिलं गेलं आहे. यावरून तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट शेड निवडणं सोपं जाईल आणि तुमचा लूक आणखी प्रभावी दिसेल.
advertisement
3/7
वाइन लिप शेड : वाईन लिपस्टिक तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी लावू शकता. हा शेड काळ्या रंगाच्या कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर किंवा साडीवर चांगला दिसतो. त्याचसोबत कोणत्याही कार्यक्रमासाठी हा योग्य असतो.
advertisement
4/7
लाल लिप शेड : काळ्या रंगाचे ड्रेस किंवा डिझायनर साड्या बहुतेकवेळा पार्ट्यांमध्ये परिधान केल्या जातात. काळ्या रंगासोबत लाल रंगाचे कॉम्बिनेशन खूप छान दिसते. काळ्या रंगाच्या पार्टी वेअर कपड्यांसोबत तुम्ही लाल रंगाची लिपस्टिक वारू शकता. यातील चेरी रेड, ब्राईट रेड, रुबी रेड आणि क्रिमसन रेड असे शेड्सही वापरून पाहा.
advertisement
5/7
ब्राऊन लिप शेड : काळ्या रंगाच्या कपड्यांवर ब्राऊन रंगाची लिपस्टिक सुद्धा छान दिसते. हे कॉम्बिनेशन कोणत्याही प्रकारच्या कपड्यांसोबत तुमचा लूक एन्हान्स करू शकते. तुम्हाला साधा पण सुंदर लूक हवा असेल तर काळ्या रंगाच्या कपड्यावर ब्राऊन लिपस्टिक एकदा वापरून पाहा.
advertisement
6/7
न्यूड लिप शेड : हल्ली मिनिमलिझम सर्वांना आवडू लागलं आहे. त्यामुळे मुलींना हल्ली लिपस्टिकही फिकट रंगाच्या आणि सिम्पल हव्या असतात. याला न्यूड कलर लिपस्टिकदेखील म्हणतात. सॉफ्ट-एलिगंट लूकसाठी काळ्या रंगाच्याड्रेसवर तुम्ही न्यूड लिपस्टिक शेड ट्राय करू शकता. हे छोट्या प्रोफेशन पार्टी किंवा कार्यक्रमांसाठी बेस्ट आहे.
advertisement
7/7
पिंक लिप शेड : पिंक लिपस्टिक चेहऱ्यावर उठून दिसतात आणि काळया रंगासोबत आणखी छान दिसतात. याने एक छान कॉन्ट्रास्टींग लूक तयार होतो. छोटे कार्यक्रम गेट टुगेदरसाठी ही लिपस्टिक तुम्ही वापरू शकता. तुम्ही रोज हलका मेकअप करत असाल तर गुलाबी किंवा बेबी पिंक रंग वापरू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beauty Tips : ब्लॅक ड्रेसवर शोभून दिसतात 'या' 5 रंगाच्या लिपस्टिक! वेगवेगळ्या प्रसंगासाठी निवडा परफेक्ट शेड