TRENDING:

Interesting Facts : उन्हाळ्यातही पांघरून घेऊन का झोपतात काही लोक? तज्ज्ञांनी सांगितली 3 इंटरेस्टिंग कारणं

Last Updated:
Interesting Facts : ऋतू कोणताही असो, काही लोकांना अंगावर पांघरून घेऊन झोपायची सवय असते. उन्हाळ्यातही हे लोक पांघरून घेऊन झोपतात. पण असं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? यामागे शास्त्रीय कारणं आहेत.
advertisement
1/7
उन्हाळ्यातही पांघरून घेऊन का झोपतात काही लोक? तज्ज्ञांनी सांगितली 3 इंटरेस्टिंग कारणं
ही खरंच एक सवय आहे की यामागे एखादे वैज्ञानिक आणि मानसिक कारण आहे. याबद्दल आपण आज महिती घेत आहोत. जागरणच्या वृत्तामध्ये नवी दिल्ली, फोर्टिस हॉस्पिटल येथील डॉ. आस्तिक जोशी यांनी महिती दिली आहे.
advertisement
2/7
डॉक्टरांच्या मते, काही लोकांना पांघरुणाशिवाय झोपणं अगदी अवघड असतं. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मानसिक सुरक्षितता. बऱ्याच लोकांना पांघरुणामुळे शांत वाटते आणि सुरक्षित असल्यासारखे वाटते. अशा लोकांसाठी अंगावरचे पांघरून आरामदायक कवचाप्रमाणे काम करते.
advertisement
3/7
बऱ्याच लोकांना पांघरून घेतल्यावर कुणाच्यातरी मिठीत सुरक्षित असल्यासारखं वाटतं. पांघरुणाच हलका स्पर्श त्यांना तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच काही लोकांना पांघरुणाशिवाय अस्वस्थ वाटतं.
advertisement
4/7
काही लोकांना पांघरून घेऊन झोपण्याची सवय लहानपणापासून असते. लहानपणापासून त्यांचं मन आणि शरीर पांघरून घेतल्यानंतर झोपेसाठी तयार होतं. म्हणजे पांघरून घेतलं की शरीराला कळतं आता अराम करायचा आहे म्हणजेच झोपायचं आहे.
advertisement
5/7
या पद्धतीनं पांघरून घेतल्यानं मेंदूला झोपण्याचे संकेत मिळतात. म्हणूनच उन्हाळ्यात सुद्धा अशा लोकांना पांघरून घेतल्याशिवाय झोप लागत नाही. अशावेळी पातळ का होईना पांघरूण घेतल्यास मेंदूला शांत होण्याचा संकेत मिळतो.
advertisement
6/7
अंगावर पांघरूण घेतल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळं शरीराचं तापमान स्थिर राहण्यास मदत होते. झोपेच्या वेळी बाहेरच्या तापमानात चढउतार झाल्यानंतर शरीराचं तापमान स्थिर करण्यास याने मदत होते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : उन्हाळ्यातही पांघरून घेऊन का झोपतात काही लोक? तज्ज्ञांनी सांगितली 3 इंटरेस्टिंग कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल