TRENDING:

Doraemon Director Death : तुमचा लाडका 'डोरेमॉन' झाला पोरका! जग सोडून गेला 'बाप', कॅन्सरने निधन

Last Updated:
Doraemon Cartoon Director Death : तुमचा सगळ्यांचा आवडत्या डोरेमॉन कार्टुनच्या दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला आहे. कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/7
तुमचा लाडका 'डोरेमॉन' झाला पोरका! जग सोडून गेला 'बाप', कॅन्सरने निधन
डोरेमॉन हे कार्टुन लहान मुलांचंच नाही तर कित्येक मोठ्यांचंही आवडतं आहे. तुम्हीही आवडीने डोरेमॉन पाहत असाल. 'डोरेमॉन' हा एक जपानी ॲनिमेशन कार्टून शो जो भारतातही खूप लोकप्रिय आहे.  'डोरेमॉन'मधील पात्रे मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण तुमचा हा लाडका आवडता डोरेमॉन पोरका, अनाथ झाला आहे.
advertisement
2/7
डोरेमॉनला या जगात आणणारा त्याचा बाप म्हणजे या कार्टुनचे दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू मृत्यू झाला आहे. ॲनिमेशन उद्योगात त्यांचं मोठं योगदान होतं. जपानमध्ये त्यांना राष्ट्रीय ॲनिमेशनचे जनक म्हणून ओळखलं जातं. शिबायामा यांनी दोन दशकांहून अधिक काळ 'डोरेमॉन'चे दिग्दर्शन केलं.
advertisement
3/7
शिबायामा त्सुतोमू यांनी 1963 मध्ये तोई ॲनिमेशनमध्ये आपल्या ॲनिमेशन प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ते ए प्रोडक्शन म्हणजे आताचं शिन-एई ॲनिमेशनमध्ये होते.
advertisement
4/7
1978 मध्ये शिबायामा यांनी ओसामू कोबायाशी आणि मिचिशिरो यामादा यांच्यासोबत 'अजिया-दो ॲनिमेशन वर्क्स'ची स्थापना करून या उद्योगातील आपलं स्थान अधिक मजबूत केलं.
advertisement
5/7
त्यांनी 1979 च्या 'डोरेमॉन' टीव्ही शोचं दिग्दर्शन केलं आणि पुढे या फ्रँचायझीवर आधारित 22 चित्रपटांचं दिग्दर्शन करून त्याला पिढ्यानपिढ्या लोकप्रिय केलं.
advertisement
6/7
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी डोरेमॉनसह चिबी मारुको-चान, लुपिन III आणि माजिमे नी फुमाजिमे काइकेत्सु झोरोरी यांसारख्या ॲनिमेटेड कार्टून शोचं दिग्दर्शन केलं.
advertisement
7/7
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. माहितीनुसार शिबायामा यांचं निधन 6 मार्च रोजीच झालं होतं. पण 17 मार्च 2026 रोजी अजिया-डो ॲनिमेशन वर्क्सने त्यांच्या निधनाची पुष्टी  केली. "20 वर्षांहून अधिक काळ 'डोरेमॉन' सीरिजचं दिग्दर्शन करणारे ॲनिमेशन दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचं 6 मार्च रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले," असं स्टुडिओने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Doraemon Director Death : तुमचा लाडका 'डोरेमॉन' झाला पोरका! जग सोडून गेला 'बाप', कॅन्सरने निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल