TRENDING:

Amitabh Bachchan : अजूनही विसरले नाहीत, सतत काळजी! अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती, दररोज सकाळी करतात मेसेज

Last Updated:
Big B Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन आपल्याला दररोज सकाळी प्रेमाने मेसेज करत असल्याचा खुलासा या व्यक्तीने स्वत:च केला आहे.
advertisement
1/7
अजूनही विसरले नाहीत, सतत काळजी! अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती, दररोज सकाळी करतात मेसेज
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट तर असतातच पण सोबतच ते त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तींनाही मेसेज पाठवतात. त्यांच्या आयुष्यातील अशीच एक खास व्यक्ती जिला ते अजूनही विसरले नाही, तिची सतत काळजी करतात आणि त्या व्यक्तीला दररोज सकाळी न विसरता मेसेजही पाठवतात.
advertisement
2/7
अमिताभ ज्या खास व्यक्तीला मेसेज पाठवतात त्या व्यक्तीनेच याचा खुलासा केला आहे. या व्यक्तीने अमिताभ आपल्याला दररोज सकाळी प्रेमाने मेसेज करत असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
3/7
ही व्यक्ती काही महिन्यांपूर्वी आजारी पडली होती. तेव्हापासून त्या व्यक्तीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अमिताभ त्या व्यक्तीला दररोज सकाळी मेसेज करतात. ते बरे होण्यासाठी प्रार्थनाही करतात. आजारी पडल्यापासून अमिताभ त्यांची विचारपूस करण्यासाठी रोज मेसेज पाठवत आहेत. त्यांनी सांगितले की, ते बरे झाले असले तरी अमिताभ अजूनही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मेसेज करतात.
advertisement
4/7
"मी आजारी पडल्यापासून मला दररोज सकाळी अमिताभ यांचा एक मेसेज येतो, लवकर बरा हो, तुझ्यासाठी प्रार्थना करतो. मी त्यांना आता ठिक आहे, असं सांगितलं. तरीही ते मला दररोज प्रेमाने एक मेसेज पाठवतात", असं त्यांनी 'द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
advertisement
5/7
आता ही खास व्यक्ती कोण आहे, जिची काळजी अमिताभ बच्चन करतात आणि दररोज सकाळी त्या व्यक्तीला न विसरता मेसेज पाठवतात हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
6/7
ही व्यक्ती आहे अभिनेते प्रेम चोप्रा. 'दो अनजाने', 'द ग्रेट गॅम्बलर', 'बेनाम', 'मर्द' आणि 'नसीब' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये प्रेम चोप्रा यांनी अनेकदा खलनायकाची भूमिका साकारली. हिंदी चित्रपटसृष्टीतील या दोन दिग्गजांमधील पडद्यामागील मैत्री अजूनही तशीच टिकून असल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
7/7
इन्फेक्शन आणि वयोमानानुसार होणाऱ्या समस्यांमुळे प्रेम यांना काही महिन्यांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीत त्यांना हृदयाच्या झडपेची गंभीर समस्या म्हणजेच एओर्टिक स्टेनोसिस असल्याचं निदान झाल होतं. उपचारानंतर त्यांचे जावई आणि अभिनेते शर्मन जोशी यांनी सोशल मीडियावर प्रेम यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून प्रेम चोप्रा बरे होत असल्याचंही सांगितलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan : अजूनही विसरले नाहीत, सतत काळजी! अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती, दररोज सकाळी करतात मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल