TRENDING:

Air Cooler Hacks: कुलर खिडकीच्या बाहेर ठेवावं की आत? कुठे मिळतो जास्त गारवा? पाहाच

Last Updated:
Best Cooler Placement Tips: उन्हाळा सुरू झालाय आणि सर्वांचे कूलर एसी बाहेर निघताय. अनेक लोक हे घरात गारवा राहावा म्हणून कूलरचा वापर करतात. पण कुलर कुठे ठेवला जात जास्त कूलिंग देते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/8
Air Cooler Hacks: कुलर खिडकीच्या बाहेर ठेवावं की आत? कुठे मिळतो जास्त गारवा? पाहाच
How To Get AC Cooling From Cooler: उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वसामान्यांच्या घरातील कूलर हे बाहेर निघतात. कारण या प्रचंड उष्णतेचा सामना करता यावा म्हणून कूलर हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. पण अनेकांची तक्रार असते की आमचा कूलर चांगली हवाच देत नाही. मग त्यांना वाटतं की एसी खरेदी करावा. पण अनेकांच्या बजेटच्या बाहेर असतो. पण हा विचार करण्याऐवजी तुम्ही कूलर का गारवा देत नाही या गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.
advertisement
2/8
कूलरची कूलिंग चांलगी मिळावी म्हणून, कूलरची जागा खुप महत्त्वाची ठरते. यासोबतच कूलर पंपाची ताकदही महत्त्वाची असते. कूलरने जास्त कूलिंग द्यावी यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.कूलरचं लोकेशन, पॅड्सची क्वालिटी, पंपाची ताकद, वॉटर टँकचा रंग हे देखील कूलरच्या कुलिंगवर परिणाम करत असते. या सर्वच गोष्टींकडे लक्ष ठेवले तर भयंकर उष्णतेतही तुम्हाला गारवा जाणवू शकतो.
advertisement
3/8
कूलर कुठे ठेवाव : कूलर टेक्निशियन सांगतात की, कूलर कुठे ठेवला आहे यावरही कूलरची कूलिंग अवलंबून असते. त्यांनी सांगितल्यानुसार, तुम्ही ग्राउंड फ्लोरवर राहत असाल तर कूलर घरात ठेवून गारवा मिळू शकतो. कारण खालच्या फ्लोअर वरील फ्लोअरपेक्षा गार असतात.
advertisement
4/8
मात्र तुम्ही वरच्या फ्लोअरवर राहत असाल जिते थेट ऊन आल्याने भिंती आणि छत तापते तर कूलर खोलीत ठेवून चालणार नाही. अशावेळी कूलर खिडकीबाहेर किंवा खिडकीच्या जवळ ठेवणे बेस्ट ठरते. कारण ते आजुबाजूची हवा ओढून गार हवा देते. पण तुम्ही ते खोलीत ठेवले तर तसा गारवा देऊ शकत नाही.
advertisement
5/8
क्रॉस-व्हेंटिलेशनकडे लक्ष द्या : कूलरने गारवा द्यावा यासाठी, घरात क्रॉस-व्हेंटिलेशन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात हवा खेळती राहण्यासाठी रस्ता नसेल, तर कूलरला थंडावा देणे कठीण होते. अशा परिस्थितीत, हवेचे सर्कुलेशन कायम ठेवण्यासाठी कूलरजवळील खिडकी किंवा दरवाजा थोडासा उघडा ठेवा. यामुळे कूलरला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत होते.
advertisement
6/8
योग्य पॅड्सचा वापर : लोक कूलर पॅड्सकडे फारसे लक्ष देत नाहीत. आपण ज्या प्रदूषणात राहतो त्यामुळे कूलर पॅड्स खूप लवकर चोक होऊ शकतात. त्यामुळे, आपल्या कूलरसोबत योग्य पॅड्स वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार पॅड्स बदलणे शक्य नसेल, तर ते हनीकॉम्ब पॅड्स बसवून घ्या. या पॅड्सचे आयुष्यमान जास्त असते आणि त्यामुळे कूलर अधिक चांगले कूलिंग देऊ शकतो.
advertisement
7/8
गोड पाण्याचा वापर : कूलरमध्ये शक्यतो गोड पाण्याचा वापर करावा. कारण अनेक शहरांमध्ये बोरिंगच्या माध्यमातून जमिनीतून येणारे पाणी हे खारे असते. तेच कूलरमध्ये टाकले जाते. यामुळे कूलरचे पॅड्स आणि कूलरच्या पंख्यावरही खारे डाग येतात. ज्यामुळे कूलरचे पॅडही लवकर ब्लॉक होतात आणि कूलर स्लो चालू लागतो. अशावेळी शक्यतो गोड पाण्याचा वापर करा.
advertisement
8/8
पंप आणि पाण्याचे योग्य पडणे : कूलरच्या पंपावरही नीट लक्ष देणे गरचेचे आहे. कूलरमध्ये पाण्याचा पंप असतो, ज्यामुळे कूलर गार हवा देतो. यामुळे चेक करा की, कूलरमधील पंप योग्य पॉवरचा आहे की नाही. यासाठी तुम्ही पाहा की, तुमचे कूलरचे पॅड योग्य प्रकारे ओले होत आहे की नाही. कधीकधी, पॅड्सना पाणी पुरवणाऱ्या पाईप्स किंवा छिद्रांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे, पॅड्स व्यवस्थित ओले होत नाहीत आणि परिणामी, कूलरमधून गरम हवा येऊ लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Air Cooler Hacks: कुलर खिडकीच्या बाहेर ठेवावं की आत? कुठे मिळतो जास्त गारवा? पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल