TRENDING:

'द ट्रॅप'मध्ये 'अडकला' अभिनेता हार्दिक जोशी! असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य

Last Updated:
Hardik Joshi : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी 'द ट्रॅप'मध्ये 'अडकला' आहे. आता हा ट्रॅप नेमका आहे तरी काय?
advertisement
1/7
'द ट्रॅप'मध्ये 'अडकला' हार्दिक जोशी! असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजे हार्दिक जोशी मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता. आता द ट्रॅपमध्ये आला आहे. 'द ट्रॅप' नाव साधं पण अर्थ खोल. ट्रॅप एक असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य.
advertisement
2/7
द ट्रॅप ही नवीन सस्पेन्स थ्रीलर फिल्म. ज्याचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या फिल्ममध्ये हार्दिक जोशी आहे. जो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
3/7
रहस्यमय कथानक असलेल्या या धमाकेदार पोस्टरने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. ते फक्त एक पोस्टर नाही, तो अंधाऱ्या खेळाचा पहिला इशारा आहे. गडद सावल्या, नजरेतलं शांत पण अस्वस्थ करणारं काहीतरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी लपवलं गेलं आहे, जे दिसत नसलं तरी पोस्टर पाहून जाणवतंय.  इथे प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय. प्रत्येक चेहरा खरा आहे की मुखवटा हे ओळखणं कठीण होत जातं, असा अंदाज पोस्टवरुन येतोय.
advertisement
4/7
पोस्टरमध्ये हार्दिक जोशीचा लूक अत्यंत गंभीर आणि रहस्यमयी दिसत आहे. बॅकग्राउंडला असलेला गडद रंग आणि सस्पेन्सची जोड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरेल, यांत शंका नाही.
advertisement
5/7
या फिल्मबाबत बोलताना हार्दिक जोशी म्हणाला, "द ट्रॅप या चित्रपटातून एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली आहे. आजवर अशा प्रकारची सस्पेन्स थ्रीलर भूमिका माझ्या वाट्याला आली नाही आणि म्हणूनच या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं.
advertisement
6/7
या चित्रपटाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने सिनेसृष्टीला एक नवा आणि दमदार चेहरा मिळत आहे. अभिनेता सुजीत जाधव या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पदार्पण करत आहे.  याशिवाय चित्रपटात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, संजय खापरे, श्याम मोहिते, स्वाती लिमये ही कलाकार मंडळी दिसणार आहेत.
advertisement
7/7
‘द ट्रॅप’ फिल्मचे निर्माते योगेश रामचंद्र जाधव,  कार्यकारी निर्माते रत्नेश पन्हाळकर आहे. कथा-दिग्दर्शन अमोल लक्ष्मण खापरे आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन निरंजन पत्की यांचं आहे. पटकथा संवाद आणि गिते अभिजीत रूपा राजेंद्र कोळेकर यांनी लिहिलंय. नितीन उगलमुगले यांचं संगीत आहे. 10 एप्रिल 2026 रोजी ही फिल्म थिएटरला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'द ट्रॅप'मध्ये 'अडकला' अभिनेता हार्दिक जोशी! असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल